शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

सीमेवरील वातावरण तापलं; चीनच्या लष्करी हालचाली वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 10:59 IST

सीमेवरील चीन आणि भारतीय सैन्याच्या हालचाली वाढल्यामुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

थंड वातावरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या हिमालयातील वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. हिमालयीन भागातील सीमेवर चीन आणि भारतीय सैन्याच्या हालचाली वाढल्या आहेत. या भागात भारत-पाकिस्तान सीमेप्रमाणे गोळीबार होत नसला, तरीही हिमालय परिसरातील वातावरण अतिशय तणावपूर्ण झाले आहे. देशभरात उन्हाच्या झळा वाढत असताना भारत-चीन सीमेवरील तणावदेखील वाढतो आहे. भारत आणि चीनची सीमारेषा 4 हजार 57 किलोमीटरची आहे. या सीमेवरील जवळपास 23 ठिकाणं अतिशय संवेदनशील समजली जातात. या भागांमध्ये भारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने येण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी भारत, चीन आणि भूतानच्या सीमेवर असणाऱ्या डोकलाम परिसरात भारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने आले होते. दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला तणाव 73 दिवसांनंतर संपुष्टात आला होता. डोकलाम प्रकरणानंतर दोन्ही देशांनी सीमावर्ती भागातील बंदोबस्तात मोठी वाढ केली आहे. चिनी सैन्याने भूतानच्या उत्तर डोकलाम भागावर कब्जा केला असून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात केला आहे. या भागात चीनने बंकर, रस्ते आणि हॅलिपॅडची उभारणी केली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षात भारत आणि चिनी सैन्यात अनेकदा तणाव निर्माण झाला आहे.  'आम्ही चिनी सैन्याच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली आहे. सीमेवरील पेट्रोलिंगमध्येही वाढ करण्यात आली आहे,' अशी माहिती 2 इन्फट्री माऊंटन डिव्हिजनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.  2 इन्फट्री माऊंटन डिव्हिजनकडे 386 किलोमीटर सीमेच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. चिनी सैन्याकडून होणारी घुसखोरी लक्षात घेता भारतीय सैन्याकडूनही आक्रमकपणे पावले उचलली जात आहेत. पश्चिम (लडाख), मध्य (उत्तराखंड, हिमाचल) आणि पूर्व (सिक्कीम, अरुणाचल) या तिन्ही भागांमध्ये भारतीय सैन्याकडून मोठ्या प्रमाणात पेट्रोलिंग करण्यात येत आहे.  

टॅग्स :chinaचीनIndian Armyभारतीय जवानBorderसीमारेषाDoklamडोकलाम