शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

डिझेल, एलपीजीनंतर आता रॉकेलवरील सबसिडी संपणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 13:00 IST

पेट्रोल-डिझेल नियंत्रण मुक्त केल्यानंतर केंद्र सरकारने आता रॉकेलवरील अनुदान संपवण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्दे रॉकेलवरील अनुदान संपवण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.  दर दोन आठवडयाला अनुदानित रॉकेलवर 25 पैसे वाढवण्यास सांगण्यात आले आहे

नवी दिल्ली, दि. 3 - पेट्रोल-डिझेल नियंत्रण मुक्त केल्यानंतर केंद्र सरकारने आता रॉकेलवरील अनुदान संपवण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पेट्रोलियम क्षेत्रात जास्तीत जास्त गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकारने बाजार अनुकूल सुधारणांवर भर दिला आहे. पेट्रोलियम क्षेत्रावरील सरकारी नियंत्रण आणि अनुदानामुळे या क्षेत्रात  खासगी कंपन्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. 

रॉकेलवरील अनुदान पूर्णपणे संपुष्टात येईपर्यंत सरकारी तेल कंपन्यांना  दर दोन आठवडयाला अनुदानित रॉकेलवर 25 पैसे वाढवण्यास सांगण्यात आले आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. इंधनावर अजूनही मोठया प्रमाणात अनुदान दिले जाते पण गावांमध्ये वेगाने सुरु असलेले विद्युतीकरण आणि सरकारने मागच्या तीनवर्षात कोटयावधी गरीब लोकांना उपलब्ध करुन दिलेले एलपीजी गॅसचे कनेक्शन यामुळे  रॉकेलची मागणी वेगाने घटत चालली आहे. 

दिल्ली-चंदीगड ही शहरे आधीच रॉकेलमुक्त शहरे म्हणून घोषित झाली आहेत तसेच डिझेलमध्ये भेसळ करण्यासाठी मोठया प्रमाणावर अनुदानित रॉकेलचा वापर केला जातो.  बाजारभावानुसार असलेल्या इंधन किंमतीचा समाजातील गरीब घटकांना फटका बसू नये यासाठी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान अत्यंत गंभीर आहेत असे अधिका-यांनी सांगितले. आतापर्यंत अडीचकोटी गरीबांच्या घरामध्ये एलपीजी गॅसची जोडणी देण्यात आली आहे. कमीत कमी रॉकेलचा वापर व्हावा यासाठी सरकार जोरदार प्रयत्न करत आहे. 

ग्रामीण भागात रात्रीच्यावेळी उजेडासाठी आणि जेवणासाठी मोठया प्रमाणावर रॉकेलचा उपयोग केला जातो. रॉकेलच्या वापरामुळे मोठया प्रमाणावर प्रदूषण वाढते तसेच कधीकधी डिझेलमध्ये भेसळकरण्यासाठीही वापर केला जातो. हे असे प्रकार रोखण्यासाठी पर्यावरण अनुकूल इंधन वापराला सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे. 

केंद्राने राज्यांच्या रॉकेल पुरवठयात 20 टक्क्यांनी कपात केली आहे. त्यामुळे 2016-17 या वर्षात रॉकेलचा वापर 21 टक्क्यांनी कमी झाला आहे. स्वच्छेने जी राज्ये केरोसिनमध्ये कपात करुन घेतायत त्यांना अतिरिक्त आर्थिक लाभ दिला जातोय त्यामुळे सुद्धा रॉकेलचा वापर कमी होतोय. भविष्यात याचे दूरगामी फायदे होतील असे सरकारचे मत आहे. येणा-या काळात रॉकेलचा वापर अजून कमी होईल.