शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या पैशानंतर सोनं खरेदी सरकारच्या रडारवर; मोठा निर्णय होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 13:00 IST

काळ्या पैशावर टाच आणण्यासाठी मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता

मुंबई: काळ्या पैशांच्या माध्यमातून सोनं खरेदी करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी मोदी सरकार नवी योजना आणणार आहे. या योजनेतून लोकांना त्यांच्याकडे असणाऱ्या सोन्याशी संबंधित कागदपत्रं दाखवावी लागतील. एखाद्या व्यक्तीकडे अतिरिक्त सोनं असल्यास त्याला याबद्दलची माहिती सरकारला द्यावी लागेल. सीएनबीसी आवाज या वृत्तवाहिनीनं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. मध्यंतरी सरकारनं प्राप्तिकराशी संबंधित माफी योजना (ऍम्नेस्टी स्कीम) आणली होती. कर चुकवेगिरी करणाऱ्यांसाठी शेवटची संधी म्हणून या योजनेकडे पाहिलं जातं. बेहिशेबी रक्कम बाळगत असल्यास त्यावर कर भरून ती रक्कम नियमित करा, असं आवाहन मोदी सरकारनं त्यावेळी केलं होतं. यातून कोट्यवधी रूपये सरकारच्या तिजोरीत जमा झाले. त्याच धर्तीवर आता बेहिशेबी सोन्यासाठी सरकार नवी योजना आणण्याच्या तयारीत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीचा निर्णय जाहीर करताच सोन्याच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली होती. अनेकांनी त्यांच्याकडे असणाऱ्या काळ्या पैशातून सोनं खरेदी केलं होतं. या आणि अशा प्रकारे होणाऱ्या सोनं खरेदीकडे सरकारनं आता लक्ष वळवलं आहे. त्यामुळे आपल्याकडे असणाऱ्या सोन्याची आणि त्यासंबंधीच्या कागदपत्रांची माहिती नागरिकांना द्यावी लागेल. याशिवाय सरकारच्या माफी योजनेचा फायदा घेण्यासाठी मूल्यांकन केंद्रावरुन प्रमाणपत्र घ्यावं लागेल.एखाद्या व्यक्तीकडे सोन्याशी संबंधित कागदपत्रं नसतील किंवा कागदपत्रांच्या तुलनेत सोन्याचं प्रमाण जास्त असेल, तर त्या व्यक्तीला याबद्दलची माहिती जाहीर करावी लागेल. यानंतर त्या व्यक्तीला अतिरिक्त सोन्यावर कर भरावा लागेल. ठराविक कालावधीसाठी ही योजना सरकार सुरू ठेवेल. कालावधी समाप्त झाल्यावर एखाद्या व्यक्तीकडे अतिरिक्त सोनं आढळून आल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. यावेळी संबंधित व्यक्तीला जबर दंड भरावा लागेस. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDemonetisationनिश्चलनीकरणGoldसोनं