शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेहावर अत्यसंस्कार केल्यानंतर रुग्णालयातून फोन आला अन् नातेवाईकांना धक्काच बसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 15:06 IST

नातेवाईकांनीही जड अंतकरणाने या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. संबंधित रुग्ण कोविड पॉझिटीव्ह असल्याने सर्व खबरदारीही घेतली होती

अहमदाबाद - गुजरातच्या सरकारी रुग्णालयातील एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. अहमदाबाद सरकारी रुग्णालयाचा निष्काळजीपणा या घटनेनंतर उजेडात आला आहे. रुग्णालयाकडून नातवाईकांना मृतदेह ताब्यात देण्यात आला होता, संबंधित मृतदेह हा कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे, मृतदेह पीपीई कीटच्या आवरणाने झाकून नातेवाईकांकडे दिला गेला. नातेवाईकांनीही जड अंतकरणाने या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. संबंधित रुग्ण कोविड पॉझिटीव्ह असल्याने सर्व खबरदारी घेत आणि शासकीय नियमांचे पालन करुन मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले. मात्र, त्यानंतर रुग्णालयातून फोन आला आणि सर्वच नातेवाईकांना धक्काच बसला. 

द हिंदू वर्तमानपत्राचे पत्रकार महेश लांगा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक माहिती शेअर केली. ती माहिती अभिसार शर्मा यांनीही शेअर करत, गुजरातमधील वृत्तवाहिनीचा व्हिडिओही शेअर केला आहे. आता, एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार असुदुद्दीन औवेसी यांनी अभिसार शर्मा यांचे हे ट्विट रिट्टिट केले आहे.  अहमदाबाद सरकारी रुग्णालयाचा निष्काळजीपणा या घटनेनंतर उजेडात आला आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह असल्याचे सांगत, रुग्णालयाकडून संबंधित रुग्णाचा मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आला. मृतदेहास पीपीई कीटच्या आवरणात गुंडाळण्यात आला होता. त्यामुळे, नातेवाईकांनीही मृतदेहाचे किंवा संबंधित नातलगाचे अंतिम मुखदर्शन न घेताच, जड अंतकरणाने या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. मात्र, अंत्यसंस्कारानंतर सिव्हील रुग्णालयातून फोन आला आणि सर्वच नातेवाईकांना धक्काच बसला. कारण, तुमच्या नातलग रुग्णाचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला असून त्यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे, आपण ज्यांच्यावर अंत्यसंस्कार केले तो मृतदेह कोनाचा होता, असा गुढ प्रश्न नातेवाईकांना पडला. 

कोरोना संकटाच्या काळातील रुग्णालयात रुग्णांची आणि नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. गुजरातमधील रुग्णालये ह प्रातनिधिक असले तरी, मुंबईतील एका रुग्णालयातही कोरोना रुग्णांच्याजवळ मृतदेह ठेवण्यात आल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाले होते. त्यानंतर, अहमदाबादमधील सिव्हील रुग्णालयाती हा प्रकार नक्कीच धक्कादायक आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याahmedabadअहमदाबादhospitalहॉस्पिटलAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी