शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

वणवे नियंत्रणात आल्यानंतर अखेर वैष्णोदेवी यात्रा पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 01:29 IST

तीन राज्यांच्या जंगलात आग : विझवण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर

ऋषिकेश : उत्तराखंडातील जंगलांमध्ये गेल्या सात दिवसांपासून पसरलेल्या वणव्यामुळे वैष्णोदेवीची बुधवारी थांबवण्यात आलेली यात्रा गुरुवारी सकाळी सुरू झाली. संझीछाट ते वैष्णोदेवी हेलिकॉप्टर सेवा तसेच कटऱ्याहून बाणगंगामार्गे चालत जाण्याचा मार्ग आज सकाळी सुरू करण्यात आला. त्यामुळे १0 हजार भाविक वैष्णोदेवीच्या दिशेने निघाले आहेत.मात्र आसपासच्या जंगलातील वणव्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडातील जंगलात पेटलेला वणवा आता हिमाचल प्रदेश व जम्मू-काश्मीरच्या जंगलात पोहोचल्याने खबरदारीचा उपाय म्हणून यात्रा थांबवण्यात आल्याचे सांगण्यात आले. या काळात रोज हजारो भाविक कटरापासून वर डोंगरापर्यंत वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी चालत जात असतात. भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्सची आग विझवण्यासाठी मदत घेतली जात आहे. याशिवाय अग्निशामक दलाचे जवान, सीआरपीएफचे जवान व एनडीआरएफचे कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. उत्तराखंडातील जंगलांतील आगीवर नियंत्रण मिळवण्याचे आतापर्यंतचे प्रयत्न यशस्वी झालेले नाहीत. त्या भागात गुरुवारी जोरदार पाऊस झाला. मात्र त्यामुळेआग पूर्णत: विझलेली नाही.आग विझवण्यासाठी अत्याधुनिक साधनांचा वापर केला जातआहे. (वृत्तसंस्था)करोडोंचे नुकसानआगीबरोबरच कटरा व एकूणच जम्मूमध्ये कडक उन्हाळ्याचा त्रासही भाविकांना व रहिवाशांना आहे. दरवर्षी उत्तराखंडातील जंगलांमध्ये आगी लागतातच, पण यंदाचा वणवा भयावह असून, त्यात करोडो रुपयांची नैसर्गिक संपत्तीही जळून खाक झाली आहे. जनावरांना आगीचा तडाखा सहन करावा लागत आहे. या आगीत अनेक जनावरे होरपळून निघाली आहेत.एसडीआरएफचीटीम आग आटोक्यात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहे. हिमाचल प्रदेशच्या सिमलाच्या आसपासच्या परिसरातही आग पसरली आहे.

टॅग्स :fireआग