शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

Yellow fungus infection : काळ्या, पांढऱ्या बुरशीनंतर आता पिवळी बुरशी; भारतात रुग्ण आढळल्यानं चिंता वाढली, जाणून घ्या लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 13:09 IST

yellow fungus infection cases reported in India . काळ्या व पांढ्या बुरशीच्या रोगाशी सामना करताना आता पिवळ्या बुरशीचा रुग्ण देशात सापडला आहे आणि तो अधिक धोकादायक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडलेला जागोजागी दिसत आहे. ऑक्सिजनची कमतरता, रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा, रुग्णांना बेड्स मिळवण्यासाठी नातेवाईकांना करावी लागणारी धडपड, ही सर्व संकटं समोर असताना नवे संकट उभे राहिले आहे. काळ्या व पांढ्या बुरशीच्या रोगाशी सामना करताना आता पिवळ्या बुरशीचा रुग्ण देशात सापडला आहे आणि तो अधिक धोकादायक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. ( After black and white fungus, yellow fungus infection cases reported in India) 

देशात मागील २४ तासांत २ लाख २२,३१५ नव्या रुग्णांची भर पडली, तर ३ लाख २,५४४ रुग्ण ब रे झाले. ४४५४ रुग्णांना मागील २४ तासांत प्राण गमवावे लागले आहेत. देशात आतापर्यंत एकूण २ कोटी ६७ लाख ५२,४४७ कोरोना रुग्ण आढळले असून त्यापैकी २ कोटी, ३७ लाख २८,०११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ३ लाख ३७२० रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत.  आतापर्यंत १९ कोटी ६० लाख ५१,९६२ जणांना कोरोना लस देण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.  काळ्या बुरशीच्या रुग्णांची संख्या वाढत असताना रविवारी उत्तर प्रदेश येथील गाझियाबाद येथे पिवळ्या बुरशीचा रुग्ण आढळला आणि ही बुरशी अधिक घातक असल्याचे सांगितले जात आहे. ( Symptoms, causes of yellow fungus, which is more dangerous than black fungus and white fungus). पिवळ्या बुरशीच्या रुग्णावर सध्या उपचार सुरू आहेत.  

काय आहेत लक्षणं ? ( Symptoms of Yellow Fungus)

  • भूक कमी लागणे किंवा लागणेच नाही, वजन कमी होणे, सुस्तपणा
  • पू ची गळती आणि जखमेवर हळूहळू उपचार होणे, कुपोषण, अवयव निकामी होणे, डोळे येणे
  • अशी लक्षणं दिसल्यास तातडीनं उपचार घेणे गरजेचे आहे.

 पिवळी बुरशी होण्यामागचं कारण ( Causes of Yellow fungus)

  • अस्वच्छता हे प्रमुख कारण आहे. त्यामुळे स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे. शिळं अन्न खाऊ नये.  
  • घरातील दमटपणाही  महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे अधिक दमट वातावणामुळे बुरशी होण्याचे संकटही वाझते.  

 

उपचार ( Treatment of Yellow Fungus) 

  •  Amphotericin B injection ( अ‍ॅम्फोटेरिसिन बी इंजेक्शन) हे यावरील औषध आहे.  
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMucormycosisम्युकोरमायकोसिस