शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
3
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
4
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
5
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
6
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
7
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
8
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
9
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
10
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
11
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
12
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
13
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
14
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
15
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
16
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
17
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
19
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
20
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले

राम रहीमला अटक झाल्यानंतर हिंसाचार माजवण्यासाठी डेराने दिले होते पाच कोटी रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 18:16 IST

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला बलात्कारप्रकरणी अटक करून दोषी ठरवल्यानंतर झालेल्या हिंसाचाराप्रकरणी तपास करत असलेल्या एसआयटीने मोठा खुलासा केला आहे. सीबीआय कोर्टाने राम रहीमला दोषी ठरवल्यानंतर डेरा सच्चा सौदाने हिंसाचार भडकवण्यासाठी ५ कोटी रुपये दिल्याची माहिती एसआयटीने दिली आहे.

पंचकुला, दि. ७ - डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला बलात्कारप्रकरणी अटक करून दोषी ठरवल्यानंतर झालेल्या हिंसाचाराप्रकरणी तपास करत असलेल्या एसआयटीने मोठा खुलासा केला आहे. सीबीआय कोर्टाने राम रहीमला दोषी ठरवल्यानंतर डेरा सच्चा सौदाने हिंसाचार भडकवण्यासाठी ५ कोटी रुपये दिल्याची माहिती एसआयटीने दिली आहे. पंचकुलामध्ये राम रहीमला झालेल्या अटकेनंतर पंचकुलामध्ये झालेलेल्या हिंसाचारामध्ये डेरा सच्चाशी संबंधित असलेले आदित्य इंन्सा, हनिप्रीत इन्सा आणि सुरिंदर धीमान इन्सा हे सहभारी असल्याचे समोर येत आहे. डेरा सच्चा सौदाच्या पंचकुला शाखेचे प्रमुख असलेल्या चमकौर सिंह यांच्याकडे डेरा व्यवस्थापनाने पैसे खर्च करण्याची जबाबदारी सोपवल्याचे तपासामध्ये  उघड झाले आहे. पंजाबमधील मोहाली जिल्ह्यातील ढकोली गावातील रहिवासी असलेल्या चमकौर याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला असून, गुन्हा दाखल झाल्यापासून तो फारार आहे.  पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर त्याच्याविरोधात २८ ऑगस्टला देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता.  पंचकुलासोबतच पंजाबच्या अन्य भागातही लोकांना भडकवण्यासाठी डेरा सच्चा सौदाकडून पैसे खर्च करण्यात आले होते. तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या हिंसाचारात प्राण गेल्यास परिवाराला आर्थिक मदत दिली जाईल, असे आश्वासनही अनुयायांना देण्यात आल्याचे एसआयटीच्या चौकशीत समोर आले आहे.  आता चमकौरला अटक केल्यानंतरच यासंदर्भातील अधिक माहिती मिळू शकेल, असे हरयाणाचे डीजीपी बी.एस. संधू यांनी सांगितले आहे.   डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीम याला  बलात्काराच्या आरोपाबद्दल सीबीआय न्यायालयाने दोषी ठरवताच पंजाब व हरयाणात त्याच्या समर्थकांनी ठिकठिकाणी जाळपोळ, दगडफेक सुरू केली होती. त्यांनी २00 हून अधिक वाहने, अनेक रेल्वे स्थानके, पेट्रोल पंप, टेलिफोन एक्स्चेंज, प्राप्तिकर कार्यालय, दूध प्रकल्प यांना आग लावली. दिल्लीत एका ट्रेनच्या बोगीही पेटवली. या हिंसाचारामुळे पोलीस व सुरक्षा दलांनी तिथे आधी लाठीमार, नंतर पाण्याचा मारा व अश्रुधूर सोडला. तरीही हा जमाव त्यांच्या अंगावर येत होता. त्यामुळे अखेर केलेल्या गोळीबारात ३८ हून अधिक जण ठार व २५0 हून अधिक लोक जखमी झाले होते.  डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला बलात्कार प्रकरणी 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.    दोषी ठरवल्यानंतर झालेला हिंसाचार लक्षात घेत त्याला तुरुंगातच न्यायालय भरवून शिक्षा सुनावण्यात आली. निकाल सुनावण्यासाठी न्यायाधीशांना विशेष हेलिकॉप्टरने रोहतकच्या तुरुंगात आणण्यात आलं होतं.  राम रहीम कोर्टरुममध्ये हात जोडून उभा असून दयेसाठी याचना करत होता. इतकंच नाही तर रडूही लागला होता. 2002मध्ये हे प्रकरण उजेडात आले होते. 

टॅग्स :Baba Ram Rahimबाबा राम रहीमDera Saccha Saudaडेरा सच्चा सौदाIndiaभारत