शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अमित शहा यांनी बैठक घेताच यूपी सरकारही लागले कामाला! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2020 05:25 IST

कोरोना : दिल्ली-नोएडा सीमेवर कोरोना तपासणीचे विशेष अभियान

विकास झाडे    लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्ये कोरोनाचा प्रकोप वाढल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बैठक घेतली. त्यानंतर लगेच उत्तर प्रदेश सरकारनेही दिल्लीच्या सीमेवर बुधवारपासून कोविड-१९ ची तपासणी सुरू केली आहे. शनिवारपासून दररोज १ लाख २० हजार तपासण्या करण्याचा केंद्र आणि दिल्ली सरकारचा संकल्प आहे.

दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून, प्रत्येक १५ मिनिटाला सरासरी एका रुग्णाचा मृत्यू होत आहे. संपूर्ण देशात मरण पावणाऱ्या प्रत्येक पाच रुग्णांपैकी एक रुग्ण दिल्लीतील असल्याची नोंद होत आहे. 

कोरोनाची स्थिती हाताबाहेर गेल्यामुळे अमित शहा आणि अरविंद केजरीवाल यांच्या बैठकीत व्यापक पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीमध्ये उत्तर प्रदेश आणि हरियाणातूनही मोठ्या संख्येने लोक नोकरीसाठी येतात. त्यामुळे आजपासून उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या सीमेवर तपासण्या सुरू करण्यात आल्या आहेत. शनिवारपासून दिल्लीत चार मोबाईल व्हॅन मोहल्ल्यामोहल्ल्यात फिरणार असून, तपासणी केली जाईल.जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर नोएडा-दिल्लीच्या सीमेवर कोरोना तपासण्या केल्या जात आहेत. आरोग्य विभागाच्या पुढील अहवालाच्या आधारे कोरोना तपासण्यांचे अभियान सुरू ठेवण्यासंबंधी निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 

लग्नाला आता ५० लोक! टाळेबंदीच्या काळात लग्नांमध्ये केवळ ५० लोकांना उपस्थित राहण्याचा आदेश काढण्यात आला होता. त्यानंतर कोरोनाचा प्रकोप कमी झाल्यानंतर ही संख्या २०० वर नेण्यात आली; परंतु दिल्लीतील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने आजपासून लग्नसमारंभात केवळ ५० लोकांना हजर राहता येईल. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यासंदर्भात नायब राज्यपालांकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविला होता. तो मंजूर करण्यात आला. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाcorona virusकोरोना वायरस बातम्या