शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

९० डिग्रीच्या पुलांनंतर आता भोपाळमध्ये रस्त्याच्या मधोमध उभारला 'आयफेल टॉवर'; मृत्यूच्या छायेत नागरिकांचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 16:44 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इंजिनिअर्सनी बांधलेल्या ९० डिग्रीच्या वळणदार पुलाचा वाद शमतो न शमतो, तोच आता वीज विभागाच्या इंजिनिअर्सनी आपला जलवा दाखवला आहे.

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ सध्या आपल्या अजब-गजब इंजिनिअरिंगमुळे देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इंजिनिअर्सनी बांधलेल्या ९० डिग्रीच्या वळणदार पुलाचा वाद शमतो न शमतो, तोच आता वीज विभागाच्या इंजिनिअर्सनी आपला जलवा दाखवला आहे. भोपाळच्या करोंद परिसरात चक्क रहदारीच्या रस्त्याच्या मधोमध हाय व्होल्टेज विद्युत टॉवर उभा करण्यात आला असून, स्थानिक नागरिक याला प्रशासनाचा नवा अजूबा आणि मृत्यूचा सापळा म्हणत आहेत.

रस्त्यावर टॉवर की मृत्यूचा सापळा?

भोपाळच्या करोंद भागातील विनायक कॉलनीत हा प्रकार समोर आला आहे. रस्त्याच्या मधोमध उभा असलेला हा हाय व्होल्टेज टॉवर केवळ वाहतुकीसाठी अडथळा ठरत नाहीये, तर नागरिकांच्या जिवावरही उठला आहे. टॉवरची उंची कमी असल्याने मोठ्या वाहनांना इथून जाणे अशक्य होते. सर्वात भयानक बाब म्हणजे, पावसाळ्यात या टॉवरखालील रस्त्यावरून चालताना करंट लागण्याची भीती असते. रहिवाशांच्या दाव्यानुसार, दरवर्षी इथे एक-दोन जणांचा करंट लागून मृत्यू होतो, पण तरीही प्रशासन ढिम्म आहे.

२० वर्षांपासून समस्या जशीच्या तशी

"गेल्या २० वर्षांपासून आम्ही या नरकयातना सोसत आहोत," अशा शब्दांत स्थानिकांनी आपला संताप व्यक्त केला. दोन दशके उलटूनही ना हा टॉवर हटवण्यात आला, ना इथे नीट रस्ता तयार करण्यात आला. अनेकदा तक्रारी करूनही वीज विभाग आणि महापालिका एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

९० डिग्रीच्या पुलाची झाली होती जगभरात चर्चा

याआधी भोपाळच्या ऐशबाग परिसरात बांधलेला १८ कोटींचा रेल्वे ओव्हरब्रिज आपल्या विचित्र डिझाइनमुळे चर्चेत आला होता. या पुलाला चक्क ९० डिग्रीचा धोकादायक वळण देण्यात आले होते. २०२५ मध्ये बांधलेल्या या पुलामुळे अपघातांची मालिका सुरू झाली होती, ज्यानंतर संबंधित इंजिनिअर्सवर कारवाई देखील करण्यात आली होती. आता या पुलाच्या वारसा हा रस्त्यातला टॉवर पुढे चालवत असल्याची टीका होत आहे.

सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली

या प्रकरणावरून आता राजकारणही तापले आहे. "हा विषय आताच आमच्या समोर आला असून विभाग याची चौकशी करेल आणि योग्य तो मार्ग काढला जाईल," असे आश्वासन भाजप प्रवक्ते अजय सिंह यादव यांनी दिले आहे. तर दुसरीकडे, "मध्य प्रदेश सरकार इंजिनिअरिंगमध्ये रोज नवनवे कीर्तिमान प्रस्थापित करत आहे. आधी ९० डिग्रीचा पूल आणि आता रस्त्यात टॉवर, हे सरकार नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे," अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते शहरयार खान यांनी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bhopal: High-Voltage Tower Erected on Road, Endangering Citizens' Lives

Web Summary : Following a 90-degree bridge controversy, Bhopal faces criticism for a high-voltage tower erected in the middle of a busy road. Locals fear electrocution, citing past fatalities. Authorities are blamed for negligence as the dangerous structure remains despite repeated complaints and political disputes.
टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश