शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

३० वर्षे दलात राहून पोलिसांवरच अविश्वास दाखवता?, सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंग यांना फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 07:39 IST

Param Bir Singh : ३० वर्षे पोलीस दलात राहून आता पोलिसांवरच अविश्वास का दाखवता, असा सवालही सर्वोच्च न्यायालयाने त्यांना विचारला.काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांना दगड मारू नयेत, असा सूचक इशाराही सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिला.

नवी दिल्ली : महाराष्ट्र सरकारने आपल्या विरोधात सुरू केलेल्या चौकशीला आव्हान देणारी ज्येष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी केलेली रिट याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेण्यास नकार दिला. मुंबई पोलीस आयुक्तपदावरून हटविण्यात आलेले परमबीर सिंग आता महाराष्ट्र होमगार्डचे संचालक आहेत.

३० वर्षे पोलीस दलात राहून आता पोलिसांवरच अविश्वास का दाखवता, असा सवालही सर्वोच्च न्यायालयाने त्यांना विचारला.काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांना दगड मारू नयेत, असा सूचक इशाराही सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिला.परमबीर सिंग यांना ही रिट याचिका मागे घेण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. हेमंत गुप्ता व न्या. व्ही. रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीठाने परवानगी दिली तसेच मुंबई उच्च न्यायालयात दाद मागा, अशी त्यांना सूचनाही केली. 

परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केले होते. मुकेश अंबानी यांच्या घरापासून जवळच स्फोटके असलेली गाडी सापडली होती तसेच मनसुख हिरेन यांचे मृत्यू प्रकरण यामध्ये पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव आरोपी म्हणून पुढे  आले. या सर्व गोष्टींनंतर महाराष्ट्र सरकारने परमबीर सिंग यांचीही चौकशी सुरू केली. त्याविरोधात परमबीर सिंग यांची बाजू ज्येष्ठ विधिज्ञ महेश जेठमलानी यांनी सर्वोच्च न्यायालयात मांडली.

न्यायालयाने म्हटले आहे की, परमबीर सिंग हे महाराष्ट्र पोलीस केडरचा एक भाग आहेत. या राज्यात पोलीस दलात त्यांनी तीसपेक्षा अधिक वर्षे सेवा बजावली आहे. आता मात्र त्यांना राज्यातील यंत्रणेवर अजिबात विश्वास उरलेला नाही. याप्रकरणी परमबीर सिंग यांनी केलेले आरोप धक्कादायक आहेत.

सरकार छळ करीत असल्याचा दावामहाराष्ट्र सरकार आपला छळ करीत आहे. आपण या सरकारला लिहिलेले पत्र मागे घेण्यास चौकशी अधिकाऱ्याने सांगितल्याचा दावाही परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात केला. 

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगSupreme Courtसर्वोच्च न्यायालय