शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बॅंकेला शिकवला धडा , 51 रूपयांच्या बदल्यात द्यावे लागले 9 हजार रूपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 12:57 IST

सरकारी कार्यालयांमध्ये काम होत नाही, स्टेट बॅंकवाल्यांची सेवा चांगली नाहीये या आणि अशा अनेक तक्रारी तुमच्याही असतील पण क्वचितच कोणी त्याविरोधात जाण्याचं पाऊल उचलत असेल.

बंगळुरू : सरकारी कार्यालयांमध्ये काम होत नाही, स्टेट बॅंकवाल्यांची सेवा चांगली नाहीये या आणि अशा अनेक तक्रारी तुमच्याही असतील पण क्वचितच कोणी त्याविरोधात जाण्याचं पाऊल उचललं असेल. पण बंगळुरूचे रहिवासी सईद हुसैनी यांनी हे धाडस दाखवलं आणि स्टेट बॅंक ऑफ इंडियाला चांगलाच धडा देखील शिकवला. केवळ 51 रूपयांसाठी सईद हुसैनी यांनी बॅंकेविरोधात तीन वर्ष लढा दिला आणि अखेर विजयी ठरले. हुसैनी यांनी स्टेट बॅंकेविरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार केली होती. कोणतीही कल्पना न देता 51 रूपये खात्यातून कमी करणे आणि खराब सेवा देणे असा त्यांचा बॅंकेवर आरोप होता. अखेर न्यायालयात याबाबत सुनावणी झाली आणि 51 रूपये परत करण्याचा आदेश बॅंकेला दिला. तसंच खराब सेवेमुळे झालेल्या त्रासाबद्दल 5 हजार रूपये आणि खटला लढण्यासाठी झालेला खर्च 4 हजार रूपये सईदला देण्याचा आदेश न्यायालयाने दिला.  thelogicalindian.com ने याबाबत वृत्त दिलं आहे. कसे खात्यातून गेले 51 रूपये -सईदने दिलेल्या माहितीनुसार, 25 मे 2015 रोजी त्यांच्या SBI खात्यातून अचानक 51 रूपये कमी झाले. त्यांनी बॅंकेत विचारलं असता, बॅंकेने घरी कुरिअरद्वारे चेकबुक पाठवलं होतं हे सईदला समजलं. चेकबुक घरी पाठवण्याचा पर्याय निवडलाच नव्हता त्यामुळे सईद हुसैनी हैराण झाले. बॅंकेत जाऊनच त्यांनी चेकबुक घेतलं होतं, त्यामुळे 51 रूपये कमी करणं चुकीचं होतं.  51 रूपयांव्यतिरिक्त सईद यांना बॅंकेबाबत अनेक तक्रारी होत्या. 2014 मध्ये 23 सप्टेंबर रोजी त्यांनी 20 हजार रूपये 'ट्विंकल पब्लिक स्कूल'च्या खात्यात ट्रान्सफर केले होते पण तीन दिवसांनंतरही पैसे जमा झाले नव्हते. सईदने त्याबाबत बॅकेला मेल केला होता पण काहीही उत्तर मिळालं नाही. त्यानंतर जवळपास 8 दिवसांनंतर पैसे खात्यात जमा झाले, पण बॅंकेने घडल्या प्रकाराबाबत साधी दिलगीरीही व्यक्त केली नाही.  बॅंकेची खराब सेवा अशाचप्रकारे सुरू होती, पण बॅंकेचे कर्मचारी सुधारण्याचं नाव घेत नव्हते अकेर ग्राहक मंचामध्ये जाण्याचा निर्णय़ घेतला असं सईद यांनी सांगितलं.  

टॅग्स :State Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडियाCourtन्यायालय