शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

२५०० कोटींच्या खैरातीनंतर गुजरात निवडणुकीची घोषणा, १८२ जागांसाठी दोन टप्प्यांत ९ व १४ डिसेंबर रोजी मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 6:46 AM

नवी दिल्ली : मतदारांना आकर्षित करण्यासाठी २५00 कोटींच्या घोषणांची खैरात करून झाल्यानंतर, अखेर गुजरात विधानसभांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या़

सुरेश भटेवरा नवी दिल्ली : मतदारांना आकर्षित करण्यासाठी २५00 कोटींच्या घोषणांची खैरात करून झाल्यानंतर, अखेर गुजरात विधानसभांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या़ गुजरातमध्ये ९ आणि १४ डिसेंबर असे दोन टप्प्यांत मतदान होईल आणि हिमाचल प्रदेशसोबत गुजरातचीही मतमोजणी १८ डिसेंबर रोजी होईल, हे निवडणूक आयोगाने बुधवारी जाहीर केले.हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुका ज्या दिवशी जाहीर झाल्या, त्यानंतर गुजरातच्या मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या गुजरात दौºयांमध्ये शेतकºयांना जीएसटीमधून ७८ कोटींची सूट, २६५ कोटींचे फ्लायओव्हर्स, १६६ कोटींचे वॉटर ट्रीटमेंट प्लांटस, ६५0 कोटी खर्चाची रो रो फेरी सेवा, २८५ कोटी खर्चाचा ट्रान्सपोर्ट हब, २८५ कोटी खर्चाचे कचरा निवारण व प्रोसेसिंग युनिट्स अशा जवळपास २५00 कोटींच्या घोषणांची खैरात भाजपाने व गुजरात सरकारने केली, हा विरोधकांचा आरोप आहे.गुजरातच्या तारखा मुद्दाम विलंबाने जाहीर करण्यात आल्या, असा काँग्रेसचा आरोप कायम आहे. काही जिल्ह्यांत पूरस्थिती होती. अधिकारी पूरग्रस्तांच्या मदतीच्या कामात गुंतले होते, त्यामुळे घोषणेला विलंब झाला, असे आयोगाने म्हटले असले, तरी त्यात तथ्य नसल्याचे काँग्रेसने पुराव्यांनिशी दाखवून दिले आहे.>दोन टप्प्यांत मतदान, १८ डिसेंबरला निकालगुजरात विधानसभेसाठी९ डिसेंबर व १४ डिसेंबर रोजी असे दोन टप्प्यांत मतदान घेण्यात येईल. मुख्य निवडणूक आयुक्त अचल कुमार ज्योती यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांची मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे १८ डिसेंबर रोजी होईल. हिमाचल प्रदेशमध्ये ९ नोव्हेंबर रोजी मतदान आहे. गुजरातची औपचारिक घोषणा झाली असली, तरी भाजपा व विरोधी काँग्रेसने प्रचाराचे बिगुल आधीच फुंकले आहे. पुढील महिनाभर प्राचाराचा वेग व विखार वाढत जाईल.>म्हणून झाली आयोगावर टीकाहिमाचल प्रदेश निवडणुकीचा कार्यक्रम १२ आॅक्टोबर रोजी जाहीर झाला. साधारणत: सहा महिन्यांच्या अंतराने मुदत संपणाºया विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची व त्यांचा कार्यक्रम एकदमच जाहीर करण्याची प्रथा आहे. मात्र, हिमाचलसोबत गुजरातची निवडणूक जाहीर न केल्याने आयोगावर टीका झाली.सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हिमाचलमध्ये १२ आॅक्टोबर ते १८ डिसेंबर अशी ६३ दिवस निवडणूक आचारसंहिता असेल, तर या गुजरातमध्ये आचारसंहितेचे बंधन जेमतेम दीड महिना असेल. गुजरातची निवडणूक जाहीर होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनदा तिथे जाऊन विविध विकासकामांच्या उद्घाटनांचा व घोषणांचा धडाका लावला होता.काँग्रेस नेते भरतसिंग सोलंकी व अशोक गहलोत पत्रकार परिषदेत म्हणाले की, पंतप्रधान मोदींसह भाजपाला विविध पायाभरणी व उद्घाटन सोहळे करता यावेत, लोकानुनयाच्या घोषणांचा वर्षाव करण्यास संधी मिळावी, इतकाच आयोगाच्या विलंबाचा उद्देश होता. गुजरातच्या पूरग्रस्त जिल्ह्यातील संबंधित अधिकाºयांनी या संदर्भात जे खुलासे केले, त्यातून जी माहिती सामोरी आली आहे, तीदेखील धक्कादायक आहे, असेही या दोन नेत्यांनी सांगितले.भरतसिंग सोलंकी म्हणाले की, गुजरातच्या विविध जिल्ह्यांतल्या बहुतांश अधिकाºयांनी मान्य केले की, गुजरातच्या अनेक जिल्ह्यांतपूर आलेलाच नाही. जिथे पूरस्थिती उद्भवली, तिथले मदतकार्य पूर्वीच पूर्ण झाले आहे.काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊ स जरूरझाला. मात्र, त्यानंतर तिथली स्थिती लगेच सामान्य झाली आणि मदतकार्यही फार पूर्वीच पूर्ण झाले, असेही या अधिकाºयांनीमान्य केले.>पहिला टप्पा१९ जिल्ह्यांतील ८९ मतदारसंघांत ९ डिसेंबर रोजी>दुसरा टप्पा१४ जिल्ह्यांतील ९३ मतदारसंघांत १४ डिसेंबर रोजी४.३३ कोटी एकूण मतदार५० हजार १२८ मतदान केंद्रे182 जागा

टॅग्स :ElectionनिवडणूकHimachal Pradeshहिमाचल प्रदेशGujaratगुजरात