शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वकिलांच्या मोदींकडे अवाच्या सव्वा मागण्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 05:36 IST

बार कौन्सिल ऑफ इंडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून देशातील वकिलांच्या कल्याणासाठी अनेक ‘माफक’ मागण्या केल्या आहेत.

नवी दिल्ली : बार कौन्सिल ऑफ इंडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून देशातील वकिलांच्या कल्याणासाठी अनेक ‘माफक’ मागण्या केल्या असून, त्यासाठी अर्थसंकल्पात दरवर्षी ५० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याची विनंती केली आहे. कौन्सिलचे अध्यक्ष अ‍ॅड. मन्ननकुमार मिश्रा यांनी पत्रात लिहिले आहे की, ही रक्कम कौन्सिल किंवा राज्य बार कौन्सिलच्या खात्यांत जमा करावेत, असे आमचे म्हणणे नाही.प्रत्येक राज्यात अ‍ॅडव्होकेट जनरलच्या अध्यक्षतेखाली ‘ट्रस्टीशिप कंपनी’ स्थापन करून तिच्याद्वारे ती वकिलांच्या कल्याणासाठी खर्च व्हावी, एवढेच आमचे म्हणणे आहे. या पैशाचा विनियोग कसा करावा हे ठरविण्यासाठी प्रत्येक राज्यात सात सदस्यीय समिती नेमावी.दरवर्षीच्या अर्थ संकल्पातील तरतूद व त्यावरील व्याजातून आमच्या ‘गरजा’ भागू शकतील, असे नमूद करून मिश्रा लिहितात की,केंद्राकडून मिळणारी ही रक्कम राज्यांच्या बार कौन्सिलला तेथील वकिलांच्या संख्येच्या प्रमाणात वाटून द्यावी.>फक्त एवढेच हवे!प्रत्येक वकील व त्याच्या कुटुंबाला २० लाख रुपयांचा विमा.सर्व आजारांवर कुठेही उपचारांसाठी विमामूल्य मेडिक्लेम विमा.नव्याने वकिली सुरू करणाऱ्यांना पाच वर्षे दरमहा १० हजार रुपये स्टायपेंड.अकाली मृत्यू झाल्यास वा अपंगत्व आल्यास दरमहा ५० हजार रुपये पेन्शन.वकिलांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र कायदा.वकिलांना घर, वाहन, लायब्ररी यासाठी बिनव्याजी कर्ज.न्यायाधिकरणांवर निवृत्त न्यायाधीशांनाच न नेमता वकिलांचीही नेमणूक.