शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

देशातील 763 खासदारांकडे 30 हजार कोटींची संपत्ती, 'या' राज्यात सर्वाधिक श्रीमंत खासदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 18:12 IST

देशातील खासदारांची सरासरी संपत्ती 38.33 कोटी रुपये...

नवी दिल्ली: असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (ADR) मंगळवारी आपली रिपोर्ट जारी केली. यात देशातील खासदारांची सरासरी संपत्ती 38.33 कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. यामध्ये राज्यसभा आणि लोकसभेतील खासदारांचा समावेश आहे. तसेच, खासदारांची एकूण संपत्ती 30 हजार कोटींच्या आसपास असल्याची माहिती रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.

भाजप खासदारांची संपत्ती 7,051 कोटी रुपये न्यूज एजन्सी आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, एडीआरने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले की, लोकसभा आणि राज्यसभेच्या 763 विद्यमान खासदारांची एकूण मालमत्ता 29,251 कोटी रुपये आहे. यातील भाजपच्या 385 खासदारांची एकूण संपत्ती 7,051 कोटी रुपये आहे. ही आकडेवारी निवडणुकीच्या वेळी खासदारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार आहे. या अहवालात खासदारांची सरासरी संपत्ती 38.33 कोटी रुपये असल्याचे म्हटले आहे. गुन्हेगारी प्रकरणे असलेल्या खासदारांची सरासरी संपत्ती 50.03 कोटी रुपये, तर गुन्हेगारी प्रकरणे नसलेल्या खासदारांची सरासरी संपत्ती 30.50 कोटी रुपये आहे.

16 BRS खासदारांची संपत्ती 6,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त भाजपच्या 385 खासदारांची एकूण संपत्ती 7,051 कोटी रुपये आहे, तर बीआरएसच्या 16 खासदारांची एकूण संपत्ती 6,136 कोटी रुपये आहे. तसेच,  वायएसआरसीपीच्या 31 खासदारांची एकूण संपत्ती 4,766 कोटी रुपये, काँग्रेसच्या 81 खासदारांची एकूण संपत्ती 3,169 कोटी रुपये आणि आम आदमी पार्टीच्या 11 खासदारांची एकूण संपत्ती 1,318 कोटी रुपये आहे.

या राज्यात सर्वात श्रीमंत खासदार प्रति खासदार सर्वाधिक सरासरी संपत्ती असलेल्या राज्यांमध्ये तेलंगणा आघाडीवर आहे. तेलंगणातील 24 खासदारांची सरासरी मालमत्ता 262.26 कोटी रुपये आहे. आंध्र प्रदेशातील 36 खासदारांची सरासरी मालमत्ता 150.76 कोटी रुपये तर पंजाबमधील 20 खासदारांची सरासरी मालमत्ता 88.94 कोटी रुपये आहे. रिपोर्टनुसार, लक्षद्वीपमधील खासदाराची सरासरी संपत्ती फक्त 9.38 लाख रुपये आहे. त्यानंतर त्रिपुरातील खासदारांची सरासरी संपत्ती 1.09 कोटी रुपये आणि मणिपूरच्या तीन खासदारांची सरासरी संपत्ती 1.12 कोटी रुपये आहे. 

टॅग्स :Member of parliamentखासदारlok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभाMONEYपैसाInvestmentगुंतवणूक