शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

युक्रेनहून परतलेल्यांना वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश शक्य नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 07:30 IST

केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात मांडली भूमिका

नवी दिल्ली : युक्रेनमधील युद्धामुळे तेथून भारतात परतलेल्या वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांना देशातील वैद्यकीय महाविद्यालयात सामावून घेता येणार नाही. अशा रीतीने प्रवेश देण्यास राष्ट्रीय वैद्यकीय आयोग कायदा परवानगी देत नाही, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे. कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिल्यास त्याचा वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जावरही परिणाम होऊ शकतो, असे केंद्र सरकारने म्हटले. 

युक्रेनमध्ये सुरू असलेले वैद्यकीय शिक्षण युद्धामुळे अर्धवट टाकून भारतात परतावे लागलेल्या विद्यार्थ्यांना देशातील वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश द्यावा, अशी मागणी करणाऱ्या काही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. त्या याचिकांबाबत केंद्रीय आरोग्य खात्याने न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात भूमिका स्पष्ट केली आहे. 

सरकारने म्हटले आहे की, नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्याने तसेच युक्रेनमधील फी खिशाला परवडणारी असल्यामुळे शेकडो भारतीय विद्यार्थी युक्रेनच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिकायला गेले होते. तेथून मायदेशात परतलेल्या विद्यार्थ्यांना देशातील वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश देता येणार नाही. या प्रतिज्ञापत्रात सरकारने म्हटले की, त्यांना येथे प्रवेश दिला तर त्या निर्णयाविरोधात अनेक याचिका दाखल होण्याची शक्यता आहे. भारतातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांत फीचे प्रमाण अधिक असून ती सर्वांनाच परवडणे शक्य नाही. 

‘मागच्या दाराने वैद्यकीय प्रवेश नाही’केंद्र सरकारने सांगितले की, युक्रेनमधील युद्धस्थितीमुळे तेथील वैद्यकीय शिक्षण अर्धवट सोडून भारतात परत यावे लागलेल्या विद्यार्थ्यांना अन्य ठिकाणच्या महाविद्यालयांत शिक्षण पुढे सुरू ठेवण्यासाठी आमची हरकत नसल्याचे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने म्हटले होते. पण आयोगाची ना-हरकत म्हणजे मागच्या दाराने वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मिळालेला प्रवेश असा अर्थ कोणीही काढू नये. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार