शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्या सुनावणीच्या रेकॉर्डिंगचा प्रशासकीय पातळीवर विचार - सर्वाेच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 02:52 IST

६ ऑगस्टपासून ही सुनावणी न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुरू होणार

नवी दिल्ली : अयोध्या जमीन वादाच्या सुनावणीचे रोजच्या रोजचे रेकॉर्डिंग केले जावे की नाही, या मागणीचा आम्ही प्रशासकीय पातळीवर विचार करू, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी म्हटले.६ ऑगस्टपासून ही सुनावणी न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुरू होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी ज्येष्ठ प्रचारक के. एन. गोविंदाचार्य यांनी केलेल्या याचिकेत अयोध्या खटल्याची दैनंदिन सुनावणीचे रेकॉर्डिंग केले जावे, अशी मागणी केली होती व ही याचिका न्यायमूर्ती एस. ए. बोबडे आणि बी. आर. गवई यांच्या खंडपीठापुढे सुनावणीस होती.सुनावणीचे थेट रेकॉर्डिंग करण्यासाठी उपकरण आमच्याकडे आहे की नाही हे आम्हाला माहीत नाही, असे गोविंदाचार्य यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील विकास सिंह यांना खंडपीठाने सांगितले. सुनावणीचे थेट प्रक्षेपण करण्यात अडचणी असतील तर सुनावणीचे रेकॉर्डिंग केले जाऊ शकेल, असे विकास सिंह यांनी खंडपीठाला सांगितले.खंडपीठाने याचिका तातडीने सुनावणीस घेण्यास नकार देऊन हा प्रश्न काहीसा संस्थात्मक आहे, असे निरीक्षण नोंदविले. मागणीचाविचार प्रशासकीय पातळीवर केला जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या खंडपीठाने आम्ही ६ आॅगस्टपासून रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वादाची सुनावणी रोजच्या रोज घेऊ, असे २ आॅगस्ट रोजी म्हटले होते. राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील अशा या विषयावर मध्यस्थांच्या माध्यमातून तोडगा शोधण्याचे प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने पुढाकार घेऊनही अपयशी ठरले आहेत.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयAyodhyaअयोध्या