शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 05:09 IST

कोणतेही नवे महसुली गाव, तालुका, जिल्हा किंवा महापालिका क्षेत्र तयार करायचे असल्यास ते ३१ डिसेंबर २०२५ अगोदरच करावेत.

नवी दिल्ली : जिल्हे, तालुके, पोलिस ठाणी, महसुली गावे इत्यादींच्या प्रशासकीय सीमांमध्ये बदल करायचे असल्यास ते ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी करून घ्यावेत, अशा सूचना केंद्र सरकारने राज्यांना दिल्या आहेत. ३१ डिसेंबरनंतर या सीमारेखा ‘फ्रीझ’ करण्यात येणार असून त्या २०२७ च्या जनगणनेसाठी अंतिम मानल्या जातील.

हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा

भारताचे महानिबंधक आणि जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण यांनी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव यांना लिहिलेल्या पत्रानुसार, १ एप्रिल २०२६ पासून जनगणना कर्मचाऱ्यांना कामाचे वाटप होईल.

कोणतेही नवे महसुली गाव, तालुका, जिल्हा किंवा महापालिका क्षेत्र तयार करायचे असल्यास ते ३१ डिसेंबर २०२५ अगोदरच करावेत. १ जानेवारी २०२६ ते ३१ मार्च २०२७ या दरम्यान बदल करता येणार नाहीत.

सीमांमधील कोणतेही बदल राज्यांच्या जनगणना संचालनालय व देशाच्या महानिबंधक कार्यालयाला ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत कळवणे बंधनकारक आहे. गणना क्षेत्रे निश्चित झाल्यावर सीमांमध्ये बदल करता येणार नाही.

जनगणना कार्यात कोणीही वगळले जाऊ नये किंवा दोनदा नोंदणी होऊ नये यासाठी प्रत्येक गाव किंवा शहराला समान आकाराच्या गणना क्षेत्रांमध्ये विभागले जाते आणि प्रत्येक क्षेत्रासाठी एक गणनाकर्ता नेमला जातो. सध्याच्या नियमानुसार, प्रशासकीय सीमा निश्चित झाल्यानंतर तीन महिने उलटल्यावर जनगणना सुरू केली जाऊ शकते.