शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'आदित्य-L1 सूर्याच्या जवळ पोहोचलं; भारताच्या पहिल्या सौर मोहिमेबद्दल इस्रोने दिली मोठी अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 14:34 IST

इस्त्रोने चंद्रयान ३ च्या यशानंतर आता सूर्याच्या अभ्यासासाठी मोठं पाऊल उचलले आहे. इस्त्रोने काही दिवसापूर्वी सूर्याच्या अभ्यासासाठी आदित्य L1 लाँच केले आहे.

इस्त्रोने चंद्रयान ३ च्या यशानंतर आता सूर्याच्या अभ्यासासाठी मोठं पाऊल उचलले आहे. इस्त्रोने काही दिवसापूर्वी सूर्याच्या अभ्यासासाठी आदित्य L1 लाँच केले आहे. आदित्य L1 संदर्भात आता इस्त्रोने अपडेट दिली आहे. आदित्य-L1 अंतराळयानाने ६ ऑक्टोबर रोजी सुमारे १६ सेकंदांसाठी ट्रॅजेक्टोरी करेक्शन मॅन्युव्हर केले आणि आता ते सूर्य-पृथ्वी लॅग्रेंज पॉइंट १ च्या दिशेने जात आहे. इस्त्रोने ट्विटरवर ही माहिती दिली आहे. ट्विटमध्ये म्हटले आही की, अंतराळयान सुस्थित आहे आणि सूर्य-पृथ्वी L1 च्या दिशेने जात आहे.

इस्रोवर दररोज १०० हून अधिक सायबर हल्ले होतात, एस सोमनाथ यांचा मोठा खुलासा

इस्त्रोने सांगितले की, '१९ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या ट्रान्स-लॅग्रॅन्गियन पॉइंट 1 इन्सर्शन युक्तीचा मागोवा घेतल्यानंतर मूल्यमापन केलेले मार्गक्रमण सुधारण्यासाठी TCM आवश्यक होते. TCM हे सुनिश्चित करते की अंतराळयान L1 च्या आसपास प्रभामंडल कक्षेच्या प्रवेशाच्या दिशेने त्याच्या इच्छित मार्गावर राहते.

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, आदित्य-एल1 ची प्रगती पथावर असल्याने काही दिवसांतच मॅग्नेटोमीटर पुन्हा सुरू होईल. ३० सप्टेंबर रोजी, आदित्य-L1 अंतराळयान पृथ्वीच्या प्रभावक्षेत्रातून यशस्वीरित्या बाहेर पडले आणि सूर्य-पृथ्वी लॅग्रेंज पॉइंट 1 (L1) च्या दिशेने मार्गक्रमण करू लागले.

आदित्य-L1 ऑर्बिटर वाहून नेणारे PSLV-C57.1 रॉकेट २ सप्टेंबर रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले. पहिल्या सौर मोहिमेचे हे प्रक्षेपण इस्रोच्या ऐतिहासिक चंद्र लँडिंग मिशन चंद्रयान-3 नंतर काही आठवड्यांनंतर झाले. ISRO नुसार, आदित्य-L1 मिशन ४ महिन्यांत त्याच्या निरीक्षणाच्या टप्प्यावर पोहोचेल.

आदित्य L1 पृथ्वीपासून सूर्याच्या दिशेने १५ लाख किमी अंतरावर स्थापित केले जाईल.इस्त्रोने दिलेल्या माहिती, ते सूर्याच्या दिशेने पृथ्वीपासून १.५ मिलियन किलोमीटर अंतरावर असलेल्या लॅग्रॅन्गियन पॉइंट 1 च्या भोवतालच्या हॉलो ऑर्बिटमध्ये ठेवले जाईल. अंतराळयान सूर्याचा अभ्यास करण्यासाठी डिझाइन केलेले ७ वेगवेगळ्या पेलोडसह सुसज्ज आहे. यापैकी ४ पेलोड्स सूर्याच्या प्रकाशाचे निरीक्षण करतील, तर उर्वरित ३ प्लाझ्मा आणि चुंबकीय क्षेत्राचे इन-सीटू पॅरामीटर्स मोजतील.

टॅग्स :Aditya L1आदित्य एल १isroइस्रो