Adina Masjid News: तृणमूल काँग्रेसचे खासदार युसूफ पठाण यांनी पश्चिम बंगालमधील मालदामध्ये असलेल्या एका मशिदीला भेट दिली. या भेटीचे व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले. या मशिदीबद्दल त्यांनी माहितीही दिली. त्यांच्या याच पोस्टवरून आता मशीद-मंदिर वाद उद्भवला आहे. युसूफ पठाण यांची पोस्ट भाजपने शेअर करताना 'सुधारित-आदिनाथ मंदिर', असे म्हटले आहे. एका व्यक्तीनेही काही फोटो शेअर करत युसूफ पठाण यांना उत्तर दिले आहे.
खासदार युसूफ पठाण यांनी एक पोस्ट केली. ही पोस्ट लिहिताना त्यांनी मशिदीतील भेटीचे फोटोही शेअर केले.
अदिना मशिदीबद्दल युसूफ पठाण यांनी काय लिहिले?
युसूफ पठाण म्हणाले, "पश्चिम बंगालमधील मालदामध्ये असलेली अदीना मशीद ही एक ऐतिहासिक मशीद आहे. ही मशीद १४व्या शतकात सुलतान सिंकदर शाह यांनी बांधली होती. ते इल्यास राजघराण्यातील दुसरे शासक होते. इसवी सन १३७३-१३७५ मध्ये ही मशीद बांधण्यात आलेली आहे. ही भारतीय उपखंडातील सर्वात मोठी मशीद आहे. ही मशीद वास्तुशिल्पाचा उत्तम नमुना आहे."
युसूफ पठाण यांनी फोटो पोस्ट केल्यानंतर त्यावर उलट सुलट प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. व्हीआर नावाच्या व्यक्तीने ग्रोक एआयला याबद्दल विचारले. ग्रोकने वेगवेगळ्या लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना वेगवेगळी उत्तरे दिली.
"युसूफ पठाण, तुम्ही सर्वात मोठ्या हिंदू मंदिरात उभे आहात"
दरम्यान, प्लॅनएच नावाने असलेल्या एका यूजरने काही फोटो पोस्ट करत युसूफ पठाण यांना उत्तर दिले.
"प्रिय युसूफ पठाण, आपण सर्वात मोठ्या हिंदू मंदिरांपैकी एक असलेल्या आदिनाथ मंदिर परिसरात उभे आहात. हे मंदिर इस्लामी आक्रमकांनी अपवित्र केलं होतं आणि ताब्यात घेतले होते. तुमच्या संदर्भासाठी काही फोटो पोस्ट करत आहे. ही अन्याय आणि अत्याचारांना दूर करण्याची आणि मंदिराचे प्रावित्र्य पुन्हा प्रस्थापित करण्याची वेळ आहे", असे युजरने म्हटले आहे.
पश्चिम बंगाल भाजपनेही या वादात उडी घेतली आहे. "सुधारणा-आदिनाथ मंदिर", असे म्हणत भाजपने युसूफ पठाण यांची पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये नवा वाद यानिमित्ताने उभा राहिला आहे.
Web Summary : Controversy erupted after Yusuf Pathan visited Adina Masjid, West Bengal. BJP claims it's a converted Adinath Temple, sharing photos challenging Pathan's historical account of the mosque's origins. This sparked a new political row.
Web Summary : यूसुफ पठान द्वारा अदीना मस्जिद, पश्चिम बंगाल की यात्रा के बाद विवाद छिड़ गया। भाजपा का दावा है कि यह एक परिवर्तित आदिनाथ मंदिर है, और मस्जिद की उत्पत्ति के पठान के ऐतिहासिक खाते को चुनौती दी है। इससे एक नया राजनीतिक विवाद खड़ा हो गया।