शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नेहरू-गांधी कुटुंबाच्या नावाला असामान्य महत्त्व, अधीर रंजन चौधरी यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 05:45 IST

राजकारणातही ब्रँड इक्विटी असते. जर आपण सध्या भाजपकडे पाहिले, तर मोदी आणि शहा यांच्याशिवाय पक्ष व्यवस्थित चालू शकतो? काँग्रेस पक्षातही गांधी कुटुंबच आमची ब्रँड इक्विटी आहे. हे एक कठोर वास्तव आहे.

कोलकाता : गांधी-नेहरू कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तीला पक्षाचे नेतृत्व करणे अवघड होईल, कारण या कुटुंबाची एक ब्रँड इक्विटी (नावाचे महत्त्व, दायित्व) आहे, असे मत काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, काँग्रेससारखा मजबूत विचारसरणीचा पक्षच भाजपचा जातीयवादी रथ रोखू शकतो.चौधरी यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, प्रादेशिक पक्ष ज्या प्रकारे काम करीत आहेत त्यावरून ते आगामी काळात आपले महत्त्व हरवून बसतील. याचाच अर्थ देश द्विधु्रवी राजकारणाकडे आगेकूच करील. अशी राजकीय परिस्थिती आल्यानंतर आम्ही पुन्हा सत्तेत येऊ शकतो. त्यामुळे काँग्रेसचे भविष्य उज्ज्वल आहे. चौधरी म्हणाले की, प्रादेशिक पक्षांमध्ये वैचारिक प्रेरणेचा अभाव आहे. तथापि, काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षांना व्यापक समर्थन आहे.चौधरी म्हणाले की, पक्षाचे नेतृत्व स्वीकारण्यास सोनिया गांधी अनिच्छुक होत्या; पण राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्ष संकटात असल्याचे पाहून त्यांनी ज्येष्ठ नेत्यांची विनंती मान्य केली. ते म्हणाले की, सोनिया गांधी यांनी संकटाच्या काळात पक्षाचे नेतृत्व केलेले आहे. कठीण काळात म्हणजे २००४ आणि २००९ मध्ये दोन वेळा काँग्रेसने सरकार स्थापन केले होते. गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीने पक्षाचे नेतृत्व करणे अवघड होईल. (वृत्तसंस्था)राजकारणातही ब्रँड इक्विटी असतेराजकारणातही ब्रँड इक्विटी असते. जर आपण सध्या भाजपकडे पाहिले, तर मोदी आणि शहा यांच्याशिवाय पक्ष व्यवस्थित चालू शकतो? काँग्रेस पक्षातही गांधी कुटुंबच आमची ब्रँड इक्विटी आहे. हे एक कठोर वास्तव आहे.काश्मिरातील कलम ३७० हटविल्याच्या मुद्यावर चौधरी म्हणाले की, केंद्रशासित प्रदेशाचे राज्यांमध्ये रूपांतर झालेले आम्ही पाहिले आहे; पण एखाद्या राज्याचे केंद्रशासित प्रदेशात रूपांतर होण्याची ही पहिलीच वेळ आहे.काँग्रेसला व्यापक समर्थनआगामी काळात प्रादेशिक पक्षांचे महत्त्व कमी होईल, असे सांगतानाच व्यापक समर्थन असलेल्या काँग्रेसला उज्ज्वल भवितव्य आहे, असा आशावाद काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीतून व्यक्त केला.

टॅग्स :Jawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूMahatma Gandhiमहात्मा गांधी