शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिराचा जाहीरनाम्यात समावेश करा, पाठिंबा देतो; विश्व हिंदू परिषदेची काँग्रेसला ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 11:22 IST

पाच वर्षे एकपक्षीय बहुमताचे सरकार चालवूनही भारतीय जनता पक्षाला राम मंदिराच्या प्रश्नावर योग्य तोडगा काढता आलेला नाही. भाजपाने राम मंदिराबाबत घेतलेल्या संयमी भूमिकेमुळे हिंदुत्ववादी संघटनांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देपाच वर्षे एकपक्षीय बहुमताचे सरकार चालवूनही भारतीय जनता पक्षाला राम मंदिराच्या प्रश्नावर योग्य तोडगा काढता आलेला नाहीभाजपाने राम मंदिराबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे हिंदुत्ववादी संघटनांमध्ये संशयाचे वातावरण तुमच्या निवडणूक जाहीरनाम्यात राम मंदिराचा समावेश करा, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ अशी ऑफर विश्व हिंदू परिषदेकडून देण्यात आली आहे

नवी दिल्ली - पाच वर्षे एकपक्षीय बहुमताचे सरकार चालवूनही भारतीय जनता पक्षाला राम मंदिराच्या प्रश्नावर योग्य तोडगा काढता आलेला नाही. भाजपाने राम मंदिराबाबत घेतलेल्या संयमी भूमिकेमुळे हिंदुत्ववादी संघटनांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले असून, काही संघटना मंदिर बांधण्यासाठी आक्रमक भूमिका घेत आहेत. दरम्यान राम मंदिराच्या प्रश्नावर सुरुवातीपासून पुढाकार घेणाऱ्या विश्व हिंदू परिषदेने या मुद्द्यावरून काँग्रेसला दिलेली ऑफर सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. तुमच्या निवडणूक जाहीरनाम्यात राम मंदिराचा समावेश करा, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ अशी ऑफर विश्व हिंदू परिषदेकडून देण्यात आली आहे. विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमारा म्हणाले की, ''राम मंदिरासाठी ज्यांनी खुलेपणाने आश्वासन दिले आहे, त्यांना पाठिंबा दिला आहे. आता काँग्रेसने राम मंदिराचा मुद्दा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात समाविष्ट केला तर आम्ही काँग्रेला पाठिंबा देण्याबाबतही विचार करू. त्यांनी आरएसएच्या स्वयंसेवकांच्या काँग्रेस प्रवेशावर घातलेली बंदी मागे घ्यावी. केवळ जानवे परिधान करून हे होणारे नाही.'' काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक राहुल गांधी यांनी राम मंदिराबाबत एक मोठे वक्तव्य केले होते. राम मंदिराचा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ठ आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत रोजगार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे ठरतील, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. दरम्यान,  विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आलेले हे वक्तव्य भाजपासाठी धक्का मानला जात आहे. तसेच राम मंदिर बांधण्याबाबत विश्व हिंदू परिषदेचा भाजपावर असलेला विश्वस उडत चालल्याचे या वक्तव्यामधून दिसत असल्याचे दिसत आहे.   

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरcongressकाँग्रेस