जन्मदर नियंत्रण कायदा जोड
By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST
..इन्फो....
जन्मदर नियंत्रण कायदा जोड
..इन्फो....भाकड गायी गुरांसाठी भत्ता गोवंश हत्त्या बंदीचे समर्थन करताना आबदेव यांनी भाकड जनावरे शेतकरी विकतात. त्यांना दोन-पाच हजार रुपये मिळतात. मात्र या जनावरांचा सांभाळ केला, तर शेण आणि गोमूत्राच्या माध्यमातून त्यांना उत्पन्न मिळू शकते. गोमूत्र आणि शेण यावर प्रकिया करणारे उद्योग वाढत आहेत. त्यामुळे याबाबत शेतकर्यांमध्ये जागृती व्हायला हवी. राज्याचे महसूल आणि कृषी मंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेऊन राज्य शासनाने बेरोजगार युवकांना देण्यात येणार्या भत्त्याच्या धर्तीवर भाकड जनावरांना भत्ता देण्याची मागणी केली आहे, असे त्यांनी सांगितले. देशातील ५१५ खासदारांची विहिंपच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली असून, या सार्यांनीच गोहत्त्या बंदीचे समर्थन केले असल्याचे ते म्हणाले.