शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जीत अदानींची 'मंगल सेवा', दिव्यांग मुलींच्या लग्नासाठी खर्च करण्याचा संकल्प; गौतम अदानी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 09:32 IST

अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी स्वतः याबद्दल माहिती दिली आहे. 

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा सुरु आहे. या महाकुंभ मेळ्याच्या संपूर्ण काळामध्ये अदाणी ग्रुपकडून (Adani Group) महाप्रसाद सेवा दिली जात आहे. या सेवेसोबतच आता अदानी ग्रुपने आणखी एक चांगला निर्णय घेतला आहे. अदानी ग्रुपने दिव्यांग मुलींच्या लग्नासाठी खर्च करण्याचा संकल्प केला आहे. अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी स्वतः याबद्दल माहिती दिली आहे. 

गौतम अदानी यांचा मुलगा जीत आणि सून दिवा एका पवित्र संकल्पाने आपले वैवाहिक जीवन सुरू करणार आहेत. जीत आणि दिवा यांनी 'मंगल सेवा' करण्याचा संकल्प केला असून त्यानुसार दरवर्षी ५०० दिव्यांग मुलींच्या लग्नात प्रत्येक मुलीला १० लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे.

गौतम अदानी यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर याबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले, "माझा मुलगा जीत आणि सून दिवा एका पवित्र संकल्पाने त्यांचे वैवाहिक जीवन सुरू करत आहेत, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. जीत आणि दिवा यांनी दरवर्षी ५०० दिव्यांग बहिणींच्या लग्नात प्रत्येक बहिणीला १० लाख रुपयांची आर्थिक मदत देऊन 'मंगल सेवा' करण्याचा संकल्प केला आहे."

याचबरोबर, "एक वडील म्हणून, ही 'मंगल सेवा' माझ्यासाठी खूप समाधानाची आणि सौभाग्याची गोष्ट आहे. मला पूर्ण विश्वास आहे की,  या पवित्र प्रयत्नातून अनेक दिव्यांग मुली आणि त्यांच्या कुटुंबांचे जीवन आनंद, शांती आणि सन्मानाने पुढे जाईल. माझी परमेश्वराकडे प्रार्थना आहे की, जीत आणि दिवा यांना सेवेच्या या मार्गावर पुढे जाण्यासाठी आशीर्वाद आणि शक्ती द्यावी", असे गौतम अदानी यांनी एक्सवरील पोस्टद्वारे म्हटले आहे.

जीत आणि दिवा यांचे उद्या लग्नगौतम अदानी यांचा मुलगा जीत अदानी आणि दिवा जैमिन शाह यांचे लग्न शुक्रवार, ७ फेब्रुवारी रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे होणार आहे. दरम्यान, जीत यांच्या लग्नाबद्दल गौतम अदानी म्हणाले होते की, त्यांचे लग्न खूप साधे आणि पूर्णपणे पारंपारिक असेल. जीत आणि दिवा यांचा साखरपुडा मार्च २०२३ मध्ये झाला होता. दिवा या देशातील प्रसिद्ध हिरे व्यापारी जैमिन शाह यांच्या कन्या आहेत. जैमिन शाह यांची कंपनी मुंबई आणि सुरतमध्ये व्यवसाय करते. तसेच, जीत अदानी हे सध्या अदानी ग्रुपच्या अनेक कंपन्यांमध्ये आपली भूमिका बजावत आहेत.

टॅग्स :Gautam Adaniगौतम अदानीmarriageलग्नDivyangदिव्यांग