शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Rafale Deal: रायफल उत्पादनापासून मोदी सरकारनं अदानींना ठेवलं दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 13:21 IST

Rafale Deal Controversy: अदानी समूहाला करारामध्ये सहभागी करण्यास सरकारचा नकार

नवी दिल्ली: राफेल विमान खरेदी प्रकरणात काँग्रेसनं केलेल्या आरोपांचा मोदी सरकारनं धसका घेतल्याचं दिसत आहे. विमान बांधणीचा कोणताही अनुभव नसताना अनिल अंबानींच्या कंपनीला राफेल विमानांच्या निर्मितीचं कंत्राट मिळालं कसं, असा प्रश्न काँग्रेसकडून वारंवार उपस्थित केला जात आहे. त्यामुळे अडचणीत आलेल्या सरकारनं आता अदानी समूहासोबत रायफलची निर्मिती करु पाहणाऱ्या रशियाचा प्रस्ताव नाकारला आहे. अदानी समूहाच्या सहकार्यानं भारतात एके सीरिजमधील अत्याधुनिक रायफल्सची निर्मिती करण्याचा प्रस्ताव रशियाकडून देण्यात आला होता. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन लवकरच रशियाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान क्साशनिकोव-103 रायफलचं उत्पादन भारतात करण्याबद्दल चर्चा होऊन दोन देशांमध्ये करार केला जाऊ शकतो. भारतात रायफलची निर्मिती करण्यासाठी अदानी समूहासोबत भागिदारी करण्यास उत्सुक असल्याचं रशियानं म्हटलं होतं. तसा प्रस्तावदेखील रशियानं दिला होता. मात्र मोदी सरकारनं हा प्रस्ताव फेटाळून लावला. दोन देश एकमेकांसोबत करार करत असताना दोन्हीपैकी एकाही देशाचं सरकार आपल्या देशातील खासगी क्षेत्रातील कंपनीचं नाव सुचवू शकत नाही, असा नियम आहे. याचा आधार घेत मोदी सरकारनं रशियाचा प्रस्ताव नाकारला. भारत आणि रशियामध्ये लवकरच रायफल निर्मितीचा करार होण्याची शक्यता आहे. असं झाल्यास रशियाच्या बाजूनं एके-47 सीरिजची निर्मिती करणारी कंपनी कराराचा भाग असेल. भारताच्या बाजूनं ऑर्डिनेन्स फॅक्टरीचा या करारात समावेश केला जाईल. त्यामुळे ऑर्डिनेन्स फॅक्टरीमध्ये या रायफलची निर्मिती केली जाईल. एके-103 रायफल एके-47चं अत्याधुनिक रुप आहे. ही रायफल संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. 

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलNarendra Modiनरेंद्र मोदीAnil Ambaniअनिल अंबानी