शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

Adani: अदानीं संपत्ती वाढीचा वेग जगात सर्वाधिक; अदानी इतके श्रीमंत कसे झाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 09:45 IST

Adani: भारतीय अब्जाधीश गौतम अदानी १३७.४ अब्ज डॉलर (सुमारे ११ लाख कोटी रुपये) संपत्तीसह जगातील तिसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत.

नवी दिल्ली : भारतीय अब्जाधीश गौतम अदानी १३७.४ अब्ज डॉलर (सुमारे ११ लाख कोटी रुपये) संपत्तीसह जगातील तिसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. फ्रान्सच्या बर्नार्ड अरनॉल्ट यांना मागे टाकत त्यांनी हे स्थान मिळवले आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकाच्या पहिल्या तीनमध्ये आशियाई व्यक्तीने प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे.अदानी आता श्रीमंतीत मस्क आणि बेझोस यांच्या मागे आहेत. टेस्लाचे संस्थापक इलॉन मस्क २५१ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह या यादीत अव्वल, तर बेजोस १५३ अब्ज डॉलर्ससह दुसऱ्या स्थानावर आहेत. टॉप-१० यादीत अदानी हे एकमेव भारतीय आहेत. रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी ९१.१ अब्ज (७.३ लाख कोटी रुपये) संपत्तीसह ११व्या क्रमांकावर आहेत. अदानी सतत गुंतवणुकीचा विस्तार करत असून, लवकरच ते आणखी श्रीमंत होतील, असा अंदाज बांधला जात आहे.

गेल्याच महिन्यात टाकले बिल गेट्स यांना मागेn गेल्या महिन्यात अदानी हे चौथे सर्वात श्रीमंत उद्योगपती ठरले होते.  त्यांनी बिल गेट्स यांना मागे टाकले होते.  n केवळ २०२२ मध्ये अदानी यांनी त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये ६०.९ अब्ज डॉलरची भर घातली आहे. हे प्रमाण कोणत्याही व्यावसायिकापेक्षा ५ पट अधिक आहे. n त्यांनी फेब्रुवारीमध्ये रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना सर्वात श्रीमंत आशियाई म्हणून मागे टाकले होते.

४.८ लाख कोटी रुपये अदानींनी केवळ या वर्षी कमावले३२  पेक्षा अधिक व्यवहार केवळ एका वर्षांत अदानींनी केले.१.३१  लाख कोटींपेक्षा अधिकचे सौदे गेल्या वर्षभरात अदानींने केले.५ पट अधिक रक्कम कोणत्याही व्यावसायिकापेक्षा कमावली

व्यवसाय कोणते? n हिरे, सिमेंटn अक्षय उर्जाn बंदरे n विमानतळे n गॅसn कोळसा उत्खननn प्रसारमाध्यमे 

आशियाई क्षेत्रात सर्वाधिक व्यवहार करणारा समूह म्हणून अदानी समूह आघाडीवर आहे.

सिमेंट व्यवसायातही पाऊल ठेवलेमे महिन्यात गौतम अदानींच्या कंपनीने होल्सीमचा भारतीय सिमेंट व्यवसाय खरेदी करण्याची घोषणा केली होती. हा करार १०.५ अब्ज डॉलरमध्ये झाला होता. या करारामुळे, अदानी समूह भारतीय सिमेंट बाजारात दुसऱ्या स्थानावर पोहोचला.

कोणती विमानतळे ताब्यात? मुंबई, अहमदाबाद, लखनउ, जयपूर, मंगळुरू, गुवाहाटी, तिरुवनंतपुरम या शहरांतील विमानतळ्यांचा समावेश आहे.

जगातील १० श्रीमंतइलॉन मस्क     २०जेफ बेजोस     १२.२गौतम अदानी     ११बर्नाड अरनॉल्ट     १०.८बिल गेट्स     ९.३४वॉरेन बफे     ७.९८लॅरी पेज     ७.९८सर्गेंई ब्रिन     ७.६४स्टिव्ह बाल्मर     ७.४७  लॅरी एलिसन     ७.४४आकडे लाख काेटींतस्राेत : ब्लूमबर्ग अब्दाधीश निर्देशांक

अदानी इतके श्रीमंत कसे झाले?कोरोन महामारीपासून (२०२०) अदानी समूहाचे शेअर्स जवळपास १ हजार टक्क्यांनी वधारले आहेत. तर अमेरिकेतील श्रीमंत संपत्ती दान करत आहेत. त्यामुळे त्यांच्या मानांकनात घसरण झाली आहे. एप्रिल २०२१ मध्ये, अदानींची एकूण संपत्ती ५७ अब्ज होती. २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात अदानींची संपत्ती जगात सर्वात वेगाने वाढली.

टॅग्स :Adaniअदानीbusinessव्यवसाय