शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांना सहा महिन्यांची शिक्षा, पाच हजारांचा दंडही ठोठावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 17:54 IST

जया प्रदा आणि इतर तिघांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

चेन्नई : अभिनेत्री आणि रामपूरच्या माजी खासदार जया प्रदा यांना चेन्नई न्यायालयाने ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. चेन्नईमधील रायपेटा येथील जया प्रदा यांच्या मालकीच्या चित्रपटगृहातील कर्मचार्‍यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या संदर्भात त्यांना पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. चित्रपटगृह चेन्नईचे राम कुमार आणि राजा बाबू चालवतात. 

दरम्यान, चित्रपटगृहातील कर्मचाऱ्यांना ईएसआयचे पैसे देण्यास चित्रपटगृहाचे व्यवस्थापन अपयशी ठरले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. यानंतर जया प्रदा यांनी कर्मचार्‍यांना पूर्ण रक्कम देण्याचे आश्वासन दिले आणि खटला रद्द करण्यासाठी न्यायालयात दाद मागितली. मात्र, कामगार सरकारी विमा महामंडळाच्या वकिलांनी जया प्रदा यांच्या अपीलवर आक्षेप घेतला. त्यानंतर या प्रकरणाशी संबंधित जया प्रदा आणि इतर तिघांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच प्रत्येकाला पाच हजार रुपये दंड भरण्यास सांगितले होते.

दोनदा रामपूरमधून खासदार झाल्याजया प्रदा यांनी समाजवादी पक्षाकडून लोकसभेत दोनदा रामपूरचे प्रतिनिधित्व केले आहे. २००४ आणि २००९ मध्ये त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून रामपूरची जागा जिंकली होती. यानंतर समाजवादी पक्षाने त्यांना तिकीट दिले नाही. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी बिजनौरमधून आरएलडीच्या तिकिटावर निवडणूक लढवली, पण त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. २०१९ मध्ये पुन्हा जयाप्रदा यांना रामपूरच्या जागेवर भाजपने उमेदवारी दिली होती. मात्र, तेव्हा सुद्धा जया प्रदा यांना पराभवाचा सामना करावा लागला.

अशी झाली होती जयाप्रदा यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात रामपूरमधून खासदार राहिलेल्या जयाप्रदा यांची राजकीय कारकीर्द १९९४ मध्ये तेलुगू देसम पक्षातून सुरू झाली. जयाप्रदा १९९६ मध्ये आंध्र प्रदेशमधून पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून आल्या होत्या. यानंतर २००४ मध्ये त्या समाजवादी पक्षात सामील झाल्या आणि दोनदा लोकसभेच्या खासदार झाल्या. त्यांनी राष्ट्रीय लोकदलाकडून लोकसभा निवडणूकही लढवली होती. नंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

टॅग्स :Jaya Pradaजया प्रदाCourtन्यायालय