शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

घरीच बनावट नोटा छापणाऱ्या अभिनेत्रीला अटक, ५७ लाखांचे बोगस चलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 05:50 IST

बनावट नोटा छापून त्या चलनात आणल्याप्रकरणी केरळ पोलिसांनी पोलिसांनी मल्याळम टीव्ही मालिकांमधील अभिनेत्रीला तिच्या आई व बहिणीसह अटक केली आहे.

इडुक्की : बनावट नोटा छापून त्या चलनात आणल्याप्रकरणी केरळ पोलिसांनी पोलिसांनी मल्याळम टीव्ही मालिकांमधील अभिनेत्रीला तिच्या आई व बहिणीसह अटक केली आहे. कोल्लम जिल्ह्यातील आपल्या घरीच ती व तिचे कुटुंबीय या नोटा छापण्यासाठी मदत करीत असत, असे पोलिसांना आढळून आले आहे.सूर्या शशीकुमार असे या अभिनेत्रीचे नाव आहे. ती कोल्लम येथे राहते. तिने आपल्या बंगलेवजा घराचा पहिला मजला बनावट नोटा छापण्यासाठी दिला होता. त्यातून नोटा छापणाºयांना जो नफा होत असे, त्यातील काही टक्के रक्कम सूर्या शशीकुमार व तिच्या कुटुंबीयांना मिळत असे. त्या घरातून पोलिसांनी प्रिंटर, कम्प्युटर, बाँड पेपर तसेच छापलेल्या नोटाही हस्तगत केल्या आहेत. बनावट नोटा छापण्यासाठीचे साहित्य विकत घेण्यासाठी सूर्या शशीकुमार हिनेच स्वत:च सुमारे साडेचार लाख रुपयांची गुंतवणूक केली होती, असे पोलसांना तपासात आढळून आले आहे. या घरात केवळ ५00 रुपयांच्याच बनावट नोटा छापल्या जात, असे प्राथमिक तपासात दिसून आल्याची माहिती कोल्लम पोलिसांनी दिली.बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाºया लष्करातील माजी सैनिकाला पोलिसांनी अटक केली होती. अन्नाकोडई भागात घातलेल्या छाप्यात पोलिसांना अडीच लाख रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या होत्या. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या अभिनेत्रीच्या घरावर छापा घालण्यात आला. या ठिकाणी सात कोटी रुपये मूल्याच्या बनावट नोटा छापण्याची योजना आखण्यात आली होती, असे पोलिसांना तपासात आढळले.पोलिसांनी शशीकुमारची आई रमादेवी (वय ५६) आणि बहीण श्रुती (२९) अशा तिघांना अटक केली आहे. बनावट नोटा छापण्यासाठी या तिघींनी ज्या लोकांना आपल्या घराचा वापर करण्यासाठी दिला होता, त्यांचाही शोध आता सुरू आहे. अभिनेत्रीच्या घरातील ५७ लाख रुपये किंमतीच्या बनावट नोटा ताब्यात घेण्यात आल्या आहेत. (वृत्तसंस्था)१ लाखात ३५ लाख रुपयेया प्रकरणी कृष्णकुमार व रवींद्रन नावाच्या दोन जणांना अटक झाली आहे. त्यांच्याकडे ३५ लाख रुपयांच्या नोटा सापडल्या आहेत.या नोटा ते १ लाख रुपयांच्या खºया नोटांच्या किमतीत विकणार होते. गेले सहा महिने नोटा छापण्याचा उद्योग अभिनेत्रीच्या घरी सुरू होता, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Arrestअटक