शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

 मेजर गोगोई दोषी आढळल्यास करणार कारवाई - लष्करप्रमुख  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 16:34 IST

 एका महिलेला हॉटेलमध्ये घेऊन गेल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले लष्करी अधिकारी मेजर लितूल गोगोई यांच्याबाबत लष्कराने सक्त भूमिका घेतली आहे. जर मेजर गोगोई हे या प्रकरणात दोषी आढळले, तर त्यांच्यावर कठोर कारवाई कण्यात येईल, असा इशारा लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी दिला आहे. 

श्रीनगर -  एका महिलेला हॉटेलमध्ये घेऊन गेल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले लष्करी अधिकारी मेजर लितूल गोगोई यांच्याबाबत लष्कराने सक्त भूमिका घेतली आहे. जर मेजर गोगोई हे या प्रकरणात दोषी आढळले, तर त्यांच्यावर कठोर कारवाई कण्यात येईल, असा इशारा लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी दिला आहे. जवानांवर दगडफेक करणाऱ्या एका काश्मिरी तरुणाला जीपसमोर बांधून फिरल्याने मेजर गोगोई हे वर्षभरापूर्वी वादात सापडले होते. आता एका महिलेला घेऊन हॉटेलच्या रूममध्ये प्रवेश करताना सापडल्याने गोगोईंबाबत नवा वाद उद्भवला आहे. याबाबत लष्करप्रमुख म्हणाले की, भारतीय लष्करामधील कोणत्याही जवानाने जर काही चुकीचे काम केले, तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. जर मेजर गोगोई यांनी काही चुकीचे काम केले असेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल."  एका तरूणीसोबर गोगोई हॉटेलमध्ये गेल्याने या वादाला सुरूवात झाली आहे. गोगोईंसोबत आलेल्या तरुणीला हॉटेलमध्ये प्रवेश नाकारल्याने गोगोई यांनी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांशी वाद घातला आणि हे प्रकरण शेवटी पोलिसांकडे पोहोचले होते. या प्रकरणी मेजर गोगोई यांची चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर त्यांना परत पाठविण्यात आले होते.  मेजर लीतुल गोगोई यांनी श्रीनगरमधील एका हॉटेलमध्ये रुम बुक केली होती. बुधवारी गोगोई हे हॉटेलमध्ये चेक- इन करत असताना त्यांचासोबत एक तरुणी होती. हॉटेल कर्मचाऱ्यांना ती तरुणी अल्पवयीन असल्याचा संशय आला. कर्मचाऱ्यांनी तरूणीचं ओळख पत्र तपासलं असता ती बडगामची रहिवासी असल्याचं समोर आलं. हॉटेलमध्ये स्थानिक तरुणींना प्रवेश दिला जाणार नाही, असं हॉटेल कर्मचाऱ्यांनी गोगोई यांना सांगितलं. यावरुन गोगोई आणि हॉटेल कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. गोगोईंसोबत आणखी एक तरुणही होता. कर्मचाऱ्यांशी वाद झाल्यानंतर संपूर्ण प्रकरण पोलिसांकडे गेल्याने गोगोई यांची चौकशी करण्यात आली. 

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतIndian Armyभारतीय जवान