शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

लष्कराच्या घातक कमांडोंनी POK मध्ये घुसून अशी केली कारवाई, IED स्फोटकांचा केला वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 11:00 IST

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भागात जाऊन कारवाई करणे इतके सोपे नव्हते पण घातक कमांडोंनी या मोहिमेतून आपले शौर्य, साहस आणि जिगर जगाला दाखवून दिली आहे.

ठळक मुद्देसर्जिकल स्ट्राईकसारखे हे ऑपरेशन वाटत असले तरी भारतीय लष्कराने याला सिलेक्टीव्ह टार्गेटींग म्हटले आहे. पाकिस्तानी लष्कराचे गस्तीवर असलेले 59 बलुच युनिट तिथे पोहोचताच त्यांना स्फोटाचा पहिला हादरा बसला.

नवी दिल्ली - भारतीय लष्कराच्या घातक कमांडोंनी पाकिस्तान व्याप्त काश्मीरच्या  रावळकोट सेक्टरमधील रुख चकरी भागात केलेल्या कारवाईचा पाकिस्तानला जबर फटका बसला आहे. पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भागात जाऊन कारवाई करणे इतके सोपे नव्हते पण घातक कमांडोंनी या मोहिमेतून आपले शौर्य, साहस आणि जिगर जगाला दाखवून दिली आहे. शनिवारी दुपारी पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमने केलेल्या हल्ल्यात मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्यासह दोन जवान शहीद झाले होते. त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्याच्या हेतूने ही कारवाई करण्यात आली. 

अशी केली कारवाई सर्जिकल स्ट्राईकसारखे हे ऑपरेशन वाटत असले तरी भारतीय लष्कराने याला सिलेक्टीव्ह टार्गेटींग म्हटले आहे. म्हणजेच  मर्यादीत स्वरुपाची ही लष्करी कारवाई होती. इनफॅन्ट्री बटालियनचे पाच ते सहा घातक कमांडो पाकव्याप्त काश्मीरमध्ये 250 ते 300 मीटर आतपर्यंत घुसले. तिथे जाऊन या कमांडोंनी आईडी स्फोटके पेरून ठेवली होती. पाकिस्तानी लष्कराचे गस्तीवर असलेले 59 बलुच युनिट तिथे पोहोचताच त्यांना स्फोटाचा पहिला हादरा बसला. त्याचवेळी तिथे ब-याचवेळापासून प्रतिक्षा करत असलेल्या कमांडोंनी बेछूट गोळीबार सुरु केला. या कारवाईत आपले तीन सैनिक ठार झाल्याचे पाकिस्तानने मान्य केले असले तरी प्रत्यक्षात हा आकडा जास्त असल्याचे गुप्तचर सूत्रांनी सांगितले. 

स्थानिक कमांडरने या ऑपरेशनची आखणी केली आणि ब्रिगेड कमांडरने मंजुरी दिली. त्यामुळे या कारवाईची सर्जिकल स्ट्राईकशी तुलना करता येणार नाही. सर्जिकल स्ट्राईक उच्चस्तरावर आखण्यात आलेली मोहिम होती. भारतीय लष्कराच्या पॅरा कमांडोंनी पीओकेमध्ये 2 किलोमीटरपर्यंत आतमध्ये घुसून पीर पंजाल भागातील चार दहशतवादी तळ आणि त्यांच्याजवळ असलेल्या दोन पाकिस्तानी चौक्या उद्धवस्त केल्या होत्या. त्यामुळे सर्जिकल स्ट्राईकशी या ऑपरेशनची तुलना होऊ शकत नाही असे लष्करी अधिका-याने सांगितले.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक