शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय वाहिन्या दाखविणाऱ्या ५० पाकिस्तानी केबलवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 11:40 IST

सॅटेलाइट रिसिव्हरसह अनेक उपकरणे जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कलाहोर : भारतीय वाहिन्यांचे कार्यक्रम दाखविणाऱ्या ५०हून अधिक पाकिस्तानी केबलचालकांची उपकरणे पाकिस्तान इलेक्शन मीडिया रेग्युलेटरी ऑथॉरिटी (पीईएमआरए) या यंत्रणेने जप्त केली आहेत. लाहोर, मुल्तान, फैसलाबाद, कराची आदी सात शहरांतील केबलचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

भारतीय वाहिन्यांचे कार्यक्रम पाकिस्तानात दाखविण्यावर पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाने  घातलेल्या बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पीईएमआरएने काही दिवसांपूर्वी दिला होता. मात्र, त्या आदेशाला काही केबलचालक जुमानत नव्हते. केबलचालकांकडून जप्त करण्यात आलेल्या उपकरणांमध्ये १४ सॅटेलाइट रिसिव्हर, ११ मोड्युलेटर, ५ ट्रान्समीटर, दोन डिजिटल बॉक्सेसचा समावेश आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करणाऱ्या केबलचालकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्याशिवाय अजूनही जे केबलचालक भारतीय वाहिन्यांचे कार्यक्रम अवैधरित्या प्रसारित करत असतील त्यांनी ते तातडीने थांबवावेत असा इशारा पीईएमआरएने दिला आहे. (वृत्तसंस्था)

१९६५ साली भारतीय चित्रपटांवर होती बंदीपाकिस्तानने याआधी अनेकदा भारतीय वाहिन्यांचे कार्यक्रम, चित्रपट यांच्या प्रसारणावर बंदी घातली होती. १९६५ साली भारत-पाकिस्तान युद्ध झाले. त्यानंतर पाकिस्तानात भारतीय चित्रपट दाखविण्यावर निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र, २००८ सालानंतर ही बंदी मागे घेण्यात आली. त्यानंतर काश्मीर प्रश्नावरून तणाव वाढल्याने पुन्हा ही बंदी घालण्यात आली. लाहोर उच्च न्यायालयाने या आदेशाविरोधात दिलेला निकाल पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर २०१८मध्ये रद्दबातल केला.

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत