अतिक्रमण विभागाची स्टॉल आणि पथारीवाल्यांवर कारवाई
By admin | Updated: April 13, 2015 23:53 IST
पुणे : कँटोन्मेंट बोर्डाच्या अतिक्रमण विभागाने सैफी रस्त्यावरील राणी लक्ष्मीबाई उद्यानाभोवती असलेले सर्व स्टॉल आणि पथारी व्यावसायिकांवर कारवाई करून हा परिसर मोकळा केला. सैफी रस्त्यावर चायनिज पदार्थांची विक्री करणा-या अनेक हातगाड्या रात्री उभ्या असतात. त्यापैकी चार स्टॉलधारकांनी पक्क्या शेड उभारल्या होत्या. उद्यानाच्या सभोवताली पथारी व्यावसायिकांचा घेराव असतो. शुक्रवारी सकाळी ...
अतिक्रमण विभागाची स्टॉल आणि पथारीवाल्यांवर कारवाई
पुणे : कँटोन्मेंट बोर्डाच्या अतिक्रमण विभागाने सैफी रस्त्यावरील राणी लक्ष्मीबाई उद्यानाभोवती असलेले सर्व स्टॉल आणि पथारी व्यावसायिकांवर कारवाई करून हा परिसर मोकळा केला. सैफी रस्त्यावर चायनिज पदार्थांची विक्री करणा-या अनेक हातगाड्या रात्री उभ्या असतात. त्यापैकी चार स्टॉलधारकांनी पक्क्या शेड उभारल्या होत्या. उद्यानाच्या सभोवताली पथारी व्यावसायिकांचा घेराव असतो. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारे बोर्डाचा अतिक्रमण विभाग आणि आरोग्य विभाग यांनी संयुक्तपणे अतिक्रमणांवर कारवाई केली. त्यानुसार या रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे काढून टाकण्यात आली.उद्यानाच्या परिसरात पथारी व्यावसायिक आणि हातगाडी चालक सतत उभे रहात असल्याने वाहतुकीची कोंडी होते. तसेच, उद्यानात येणा-या नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे ही अतिक्रमणे हटवून उद्यानाचा परिसर मोकळा करण्यात आल्याचे बोर्डाच्या अधिका-यांनी सांगितले.अतिक्रमण विरोधी कारवाईत सापडलेला माल संबंधितांना परत देण्यात येणार नाही, तो जप्त करण्यात असल्याचे अधिका-यांनी स्पष्ट केले. माननीयांचे स्टॉल?बोर्डाच्या हद्दीत प्रमुख रस्त्यांवर काही आजी आणि माजी सद्स्यांचेच स्टॉल आहेत. त्या स्टॉलवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्या माननीयांच्या स्टॉलवर कारवाई होणार का, असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.