शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

रायन स्कूलमधील घटना पाहून 10 वर्षाच्या चिमुरडीने सांगितलं काकाने केलेलं कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 12:52 IST

रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एका व्यक्तीने त्याच्या 10 वर्षाच्या भाचीसोबत केलेलं कृत्य समोर आलं आहे.

ठळक मुद्देरायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एका व्यक्तीने त्याच्या 10 वर्षाच्या भाचीसोबत केलेलं कृत्य समोर आलं आहे. दिल्लीत एका १० वर्षांच्या मुलीला तिच्या आईने रायन स्कूलमध्ये घडलेल्या घटनेनंतर विश्वासात घेत 'गुड टच, बॅड टच' बद्दल सांगितलं.आईने सांगितलेल्या या गोष्टीनंतर त्या चिमुरडीने सगळ्यांनाच धक्का बसेल अशी घटना सांगितली.

नवी दिल्ली, दि. 19- गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या सात वर्षीय मुलगा प्रद्युम्नच्या हत्येचे पडसाद सगळीकडेच पाहायला मिळत आहे. पालकांकडून या घटनेचा निषेध करत आंदोलन केलं गेलं. रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एका व्यक्तीने त्याच्या 10 वर्षाच्या भाचीसोबत केलेलं कृत्य समोर आलं आहे. दिल्लीत एका १० वर्षांच्या मुलीला तिच्या आईने रायन स्कूलमध्ये घडलेल्या घटनेनंतर विश्वासात घेत 'गुड टच, बॅड टच' बद्दल सांगितलं. आईने सांगितलेल्या या गोष्टीनंतर त्या चिमुरडीने सगळ्यांनाच धक्का बसेल अशी घटना सांगितली. मुलीच्या सख्ख्या काकानेच त्या मुलीचा लैंगिक छळ केला होता. मुलीने सांगितलेली ही घटना ऐकुन तिच्या आईला ऐकून धक्का बसला. तिने याप्रकरणाची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आणि दीराला तुरूंगातही पाठवलं. 

१० वर्षांची मुलगी बुराडी येथील उत्तरांचल कॉलनीत राहते. हे कुटुंब मूळचं उत्तराखंडचं आहे. आरोपी विनोद कुमार (३६) घरीच बांगड्या आणि इतर सामान विकायचा. एकत्र कुटुंब असल्यामुळे आरोपी या मुलीच्या कुटुंबासोबतच राहायचा. मे महिन्यात मुलगी घरी एकटी असताना आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. नंतर मुलीला धमकावून गप्प राहायला सांगितलं. त्याच्या पुढल्याच महिन्यात जून २०१७ मध्ये त्याचं लग्न झालं. मुलगी घाबरून कोणालाच काही बोलली नाही, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

रायन इंटरनॅशनलमध्ये प्रद्युम्नच्या हत्येची घटना टिव्ही, वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकांसमोर आली. त्यानंतर या मुलीच्या आईने या घटनेसंदर्भातल्या बातम्या, चर्चा ऐकल्या होत्या. यानंतर  काहीही झालं तर लपवून ठेवायचं नाही, असं त्या मुलीला तिच्या आईने प्रेमाने समजावलं. 10 वर्षाच्या मुलीला विश्वासात घेतल्यानंतर त्या मुलीने तिच्या आईला घटलेला सगळा प्रकार सांगितला. सख्ख्या काकाने केलंलं कृत्य तिने आईला सांगितलं. ही घटना समोर आल्यानंतर त्या मुलीची मेडीकल करण्यात आली, तसंच तिच्या मनातून या घटनेबद्दलची भीती काढण्यासाठी तिचं समुपदेशनही करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.