नवी दिल्ली : महिलांवरील अॅसिड हल्ले आणि अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटनांवर शुक्रवारी राज्यसभेत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली़ अशा प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा तसेच पीडितेच्या पुनर्वसनासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची एकमुखी मागणी सदस्यांनी केली़यावर संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी सदस्यांच्या चिंता सरकारपर्यंत निश्चितपणे पोहोचवल्या जातील, असे आश्वासन सभागृहाला दिले़शून्य प्रहरात जनता दल (युनायटेडचे) के़सी़ त्यागी यांनी महिलांवरील वाढत्या अॅसिड हल्ल्यांचा मुद्दा उपस्थित केला़ आपल्या कायद्यांत अॅसिड हल्ल्यातील दोषींना विशिष्ट शिक्षेची तरतूद नाही़
महिलांवरील अॅसिड हल्ले चिंताजनक
By admin | Updated: February 28, 2015 00:58 IST