शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘अच्छे दिन’ ते ‘कालाधन’ गुजरातच्या प्रचारातून गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 13:17 IST

विरोधी पक्षांनाही विसर : जनता तर म्हणतेय... ‘ईट इज जस्ट फन’

शांतीलाल गायकवाड

सुरत : ‘अच्छे दिन आनेवाले है’,पासून  ‘कालाधन लावूंगा, सबके खाते में पंद्रह लाख’ या  सर्वच घोषणा यंदा गुजरात विधानसभेच्या प्रचारातून व चर्चेतूनही अक्षरश: गायब होत्या. भारतीय जनता पार्टीला देशाची सत्ता काबीज करण्यात महत्त्वपूर्ण ठरलेल्या या घोषणांचा विरोधी पक्षांनाही चक्क  विसर पडला,  तर जनता या घोषणांना आता ‘ ईट इज जस्ट फन’ म्हणेपर्यंत परिपक्व झाल्याचे दिसले. 

गुजरात निवडणुकीत मतदानाचा पहिला टप्पा गुरुवारी (दि.१) पार पडला. या टप्प्याचा प्रचार रंगला तो फक्त ‘ये गुजरात मैने बनाया है’ ते ‘३०० युनिट मुफ्त मै बिजली’ या घोषणा भोवतीच. भाजपाचा प्रचार, ‘ये गुजरात मैने बनाया है’ पासून सुरू होऊन, ‘मुझपे चढ गया भगवा रंग रंग’ इथंपर्यंत येऊन थांबत होता, तर ‘आप’ने केलेली ३०० युनिटची घोषणा  तेवढी लोकप्रिय ठरलेली दिसली; परंतु २०१४ पूर्वी भाजपाने ज्या ज्या  लोकप्रिय घोषणा केल्या होत्या. त्या सर्वच घोषणा या प्रचारातून हद्दपार  झालेल्या होत्या. जनतेच्या अल्पस्मृतीतून तर या घोषणा केव्हाच बाद झाल्या; परंतु विरोधी पक्षांनाही या घोषणांचा विसर पडला, हे विशेष. 

काँग्रेस उमेदवार पुनाजीभाई गामीत यांच्या प्रचार नियोजनासाठी  पश्चिम बंगालमधून आलेले शेख मुनाफ यांना या संदर्भात विचारले असता ते म्हणाले, हे खरंय. ते मुद्दे प्रचारात यायला हवेत; परंतु येत नाहीत. ही खेदाचीच बाब आहे. काँग्रेस नेते हे मुद्दे का उचलत नाहीत? या प्रश्नावर त्यांच्याकडेही उत्तर नव्हते. पुनाभाईच्या प्रचार रॅलीत मात्र ‘सरकार लुटे रे भाई, सरकार लुटे’ हे गीत तेवढे वाजत होते. लिंबायत मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार गोपाल पाटील यांनी मात्र सांगितले की, ‘बहुत पडी महंगाई की मार, अबकी बार मोदी सरकार’ अशी घोषणा देणारे भाजपा व नरेंद्र मोदी आदी मंडळींना नागरिक जाब विचारणार का? 

‘जनतेने विसरून जाणेच बरे’nवराछातील हिरा बाजारातील सटोडिया अमिनभाई यांनी भाजपाच्या घोषणांवर बोलणे टाळले, तर रिंगरोडच्या बेगमवाडी मार्केटमधील भावेश पटेल यांनी, त्या घोषणा म्हणजे ‘जस्ट ए फन’ म्हणून जनतेने विसरून जाणेच बरे असे सांगितले. nया उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या जाहीर सभातून काँग्रेसमुळेच गेले ७० वर्षे गरिबी वाढली असे छातीठोकपणे सांगत आहेत व त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे.

 

टॅग्स :GujaratगुजरातGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022Narendra Modiनरेंद्र मोदी