यशोधरानगरातील हत्याप्रकरणात आरोपी गजाआड
By admin | Updated: September 3, 2015 23:52 IST
अनैतिक संबंधातून हत्या : आरोपींची कबुली
यशोधरानगरातील हत्याप्रकरणात आरोपी गजाआड
अनैतिक संबंधातून हत्या : आरोपींची कबुलीनागपूर : बुधवारी रात्री यशोधरानगरात झालेल्या गणेश देवीदास गायकवाड (वय ३५,रा.चंदननगर) याच्या हत्याकांडातील आरोपीच्या मुसक्या बांधण्यात अखेर पोलिसांनी यश मिळवले. विश्वनाथ सिद्धार्थ चव्हाण (वय २९,रा.आदर्शनगर) आणि सूरज विवेकनाथ खंडारे अशी आरोपींची नावे आहेत. गायकवाड गुन्हेगारी वृत्तीचा होता. काही दिवसांपूर्वीच तो एका सुपारी प्रकरणातून कारागृहातून बाहेर आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला पुन्हा खंडणी वसुलीच्या आरोपाखाली अटक केली. त्यामुळे तो चांगलाच निर्ढावला होता. आरोपी चव्हाणचा तो मामा लागायचा. मात्र, आपल्याच नात्यातील एका महिलेसोबत कुख्यात गायकवाडचे अनैतिक संबंध असल्याचे समजल्याने चव्हाण चिडून होता. वारंवार समजावूनही तो ऐकत नव्हता. उलट तो चव्हाणलाच धाक दाखवू लागल्याने चव्हाणने खंडारेच्या मदतीने बुधवारी रात्री त्याची धम्मदीपनगर, भीमशक्ती बौद्धविहारसमोर तलवारीचे घाव घालून भीषण हत्या केली. यशोधरानगर पोलिसांनी लगेच धावपळ करून दोन्ही आरोपींना अटक केली. ही हत्या अनैतिक संबंधामुळेच केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांकडे दिली.--