नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कनिष्ठ बंधू प्रल्हाद यांनी मंगळवारी केंद्र सरकारवर लक्ष्य साधत हे सरकार जनतेच्या अपेक्षांना खरे उतरले नाही व त्यांच्या समस्यांवर तोडगाही काढू शकले नाही, असा आरोप करून मोदींना घरचा अहेर दिला.आॅल इंडिया फेअर प्राईस शॉप फेडरेशनच्या वतीने विविध मागण्यांसाठी जंतरमंतरवर निदर्शने केली. प्रल्हाद या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले असून ते या संघाचे अध्यक्ष आहेत. ते म्हणाले, भाजपला लोकसभेत बहुमत मिळवून देण्यासाठी तुम्ही प्रचंड मेहनत घेतली; परंतु तरीही आपल्या मागण्यांसाठी तुम्हाला येथे धरणे द्यावी लागत आहेत. हे रालोआ सरकारचे अपयश आहे असे मी मानतो. माझे हे आंदोलन म्हणजे भावाविरुद्धची बंडाळी नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मोदींच्या भावाचे सरकारवर आरोप
By admin | Updated: March 18, 2015 00:13 IST