शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

१० मिनिटांपर्यंत ट्रेनमध्ये न पोहोचल्यास तिकिट रद्द होणार का? जाणून घ्या यामागील सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 18:10 IST

Indian Railway : रेल्वेने केलेल्या प्रत्येक बदलाचा सामान्यांवर मोठा परिणाम होत असतो.

Railway New Rules | नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखोच्या घरात आहे. भारतीय रेल्वे नवनवीन उपक्रम, नवनवीन बदल करून प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी प्रयत्नशील असते. रेल्वेने केलेल्या प्रत्येक बदलाचा सामान्यांवर मोठा परिणाम होत असतो. दरम्यान, सोशल मीडिया आणि मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, जर एखादा प्रवासी रेल्वेच्या नियोजित वेळेच्या १० मिनिटांपर्यंत आपल्या सीटवर पोहोचला नाही तर त्याचे तिकिट रद्द केले जाऊ शकते. 

अनेकदा उशीर झाल्यामुळे प्रवासी त्यांच्या मूळ स्टेशनऐवजी पुढील स्टेशनवर जाऊन ट्रेन पकडतात. पण, या नवीन नियमानंतर ते ट्रेनमध्ये चढू शकणार नाहीत, असे सांगितले जात आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, रेल्वेने नवा नियम बनवला आहे. त्यानुसार, ट्रेन सुरू झाल्यानंतर १० मिनिटांत प्रवासी सीटवर पोहोचला नाही, तर संबंधित प्रवाशाचे तिकीट रद्द केले जाईल.

१० मिनिटे उशीर झाल्यास तिकीट रद्द होणार?भारतीय रेल्वेमध्ये चेंकिंग स्टाफ हॅन्ड हेल्ड टर्मिनलच्या माध्यमातून तिकीट चेकिंग केले जाते. यात प्रवासी आला आहे किंवा नाही याची माहिती द्यावी लागते. यापूर्वी हे काम कागदांवर चालायचे. यात टीटीई पुढील स्टेशनपर्यंत वाट पाहत होता. अशा परिस्थितीत जर कोणी १० मिनिटांपर्यंत त्याच्या सीटवर आला नाही तर त्याचे तिकीट रद्द केले जाईल. पण, लक्षणीय बाब म्हणजे अद्याप रेल्वेने याबाबत कोणताही आदेश जारी केला नाही. या आदेशाबाबत रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, असा कोणताही आदेश रेल्वेकडून जारी करण्यात आलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रेल्वेच्या म्हणण्यानुसार सध्याच्या नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेpassengerप्रवासी