शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

‘मोदीकेअर’ वार्षिक १२०० रुपयांमध्ये, आरोग्य विमाकवच, निवड सामाजिक जनगणनेनुसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 05:41 IST

देशातील १0 कोटी कुटुंबांतील ५0 कोटी लोकांना आरोग्याचे विमाकवच देण्यासाठी केंद्र सरकारला १२ हजार कोटी रुपये खर्च करणार असले, तरी प्रत्येक कुटुुंबामागे सरकारला केवळ १,000 ते १,२00 रुपयांचा खर्च येणार आहे.

नवी दिल्ली : देशातील १0 कोटी कुटुंबांतील ५0 कोटी लोकांना आरोग्याचे विमाकवच देण्यासाठी केंद्र सरकारला १२ हजार कोटी रुपये खर्च करणार असले, तरी प्रत्येक कुटुुंबामागे सरकारला केवळ १,000 ते १,२00 रुपयांचा खर्च येणार आहे.अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या या योजनेला ‘मोदीकेअर’ म्हणून ओळखले जात असून, १५ आॅगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर अथवा २ आॅक्टोरला गांधी जयंतीच्या मुहूर्तावर ही योजना सुरू होणार आहे.केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी सांगितले की, या योजनेचा ६0 टक्के खर्च केंद्र सरकार, तर ४0 टक्के खर्च राज्य सरकार करील. शिक्षण व आरोग्य उपकर १ टक्क्याने वाढविण्यात आला असून, त्यातून मिळणारे ११ हजार कोटी रुपये या योजनेसाठीवापरले जातील.नीति आयोगाचे सल्लागार आलोक कुमार यांनी सांगितले की, पहिल्या वर्षी ५0 टक्के लोकांना या योजनेचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा आहे. प्रत्येक कुटुंबाला ५ लाखांचे विम्याचे कव्हर मिळेल.सरकारला प्रतिकुटुंब हप्ता १,000 ते १,२00 रुपयांपर्यंत भरावा लागेल. लाभधारकांची निवड २0११ च्या सामाजिक-आर्थिक जात जनगणनेनुसार केली जाईल.केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदनयांनी सांगितले की, कुटुंबाच्या आकारावर कोणतीही मर्यादा नसेल. योजनेचापैसा सरकारी व्यवस्थेतच राहावा, यासाठी आंध्र प्रदेशातील आरोग्यश्री योजनेसारखे मॉडेल राज्यांनी निवडावे, असे आम्हाला वाटते. २४ राज्यांच्या स्वत:च्या आरोग्य संरक्षण योजना नव्या योजनेते विलीन होतील. देशभर केंद्राचीच आरोग्य योजना सुरू होईल.काही ठिकाणी ५ वर्षांनीमाजी केंद्रीय आरोग्य सचिव के.सुजाता राव यांनी सांगितले की, ज्या राज्यांकडे आधीच अशा योजना आहेत, तेथे मोदी केअरची अंमलबजावणी तत्काळ होऊ शकेल. डॉक्टर व रुग्णालयांची कमीसंख्या असलेली जी राज्ये योजना राबविण्यास अनिच्छुक असतील, तेथेसंपूर्ण अंमलबजावणीसाठी ४ ते ५ वर्षेलागू शकतील.

टॅग्स :Healthआरोग्य