शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
3
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
4
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
5
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
6
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
7
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
8
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
9
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
10
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
11
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
12
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
13
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
14
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
17
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

काँग्रेसच्या सर्व्हेनुसार कर्नाटकात पुन्हा काँग्रेसचीच सत्ता 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 9:35 AM

कर्नाटकमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची चर्चा सध्या देशभरात सुरु आहे. या निवडणुकीसाठी कॉंग्रेस आणि भाजपा यांच्यात चुरशीची लढत पाहयला मिळणार आहे, कारण कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकात जोरदार प्रचारसभा सुरु आहेत.  

बंगळुरु : कर्नाटकमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची चर्चा सध्या देशभरात सुरु आहे. या निवडणुकीसाठी कॉंग्रेस आणि भाजपा यांच्यात चुरशीची लढत पाहयला मिळणार आहे, कारण कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकात जोरदार प्रचारसभा सुरु आहेत.  सध्या कर्नाटकात कॉंग्रेसचे सरकार आहे. कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ 3 जूनला संपुष्टात येत आहे. 225 सदस्यांच्या विधानसभेच्या 224 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पार्टीने अंतर्गत सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे सरकार पुन्हा सत्तेत येईल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. विशेष म्हणजे 2013 मधील निवडणुकीपेक्षा चार जागा कॉंग्रेसला जास्त मिळतील. म्हणजेच आगामी निवडणुकीत कॉंग्रेसला 126 जागा मिळतील. याचबरोबर, भाजपाला या सर्व्हेनुसार 70 जागा मिळतील अशी शक्यता वर्तविली आहे. विशेष म्हणजे गेल्या सर्व्हेच्या तुलनेत भाजपाला 30 जागा जास्त मिळतील, तर जेडीएसला फक्त 27 जागा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, हा सर्व्हे  154 जागांसाठी जवळपास सर्व जिल्ह्यातून आणि 22, 357 लोकांमधून केला आहे.   याआधी सुद्धा अशाप्रकारचा सर्व्हे कॉंग्रेसकडून करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परिवर्तन यात्रेनंतर राहुल गांधी यांच्या दौ-याआधी सर्व्हे करण्यात आला होता. त्यावेळी कॉंग्रेसला 105 जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यावेळी कॉंग्रेसला सरकार स्थापन करण्यासाठी 113 जागांची गरज असताना सर्व्हेनुसार आठ जागा कमी दाखविण्यात आल्या होत्या. तसेच, भाजपाचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार बी एस येदियुरप्पा यांच्यापेक्षा कॉंग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या जास्त लोकप्रिय असल्याचेही या सर्व्हेत म्हटले आहे. दोन्ही नेत्यांमध्ये 19 टक्क्यांचे अंतर दिसून येत आहे.  

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८