शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

ग्रेनेडचा अपघाती स्फोट: कॅप्टन, जेसीओ ठार; जम्मू आणि काश्मीरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 07:39 IST

जम्मू आणि काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक (एलओसी) रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली

जम्मू : ग्रेनेडचा अपघाताने स्फोट होऊन लष्करी कॅप्टन व ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर (जेसीओ) असे दोनजण ठार झाले. जम्मू आणि काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक (एलओसी) रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. 

भारतीय लष्कराचे जवान मेंधर सेक्टरमध्ये कर्तव्य बजावत असताना, रविवारी रात्री हा स्फोट झाला. यात कॅप्टन आनंद व जेसीओ नायब सुभेदार भगवान सिंह हे जखमी झाले. त्यांना तातडीने हेलिकॉप्टरने लष्कराच्या उधमपूर येथील कमांड रुग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, असे लष्कराच्या जम्मू विभागाचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल देवेंदर आनंद यांनी सांगितले. 

कॅप्टन आनंद हे बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील चंपा नगरचे, तर नायब सुभेदार भगवान सिंह हे उत्तर प्रदेशच्या आंबेडकर नगर जिल्ह्यातील पोखर भिट्टा येथील रहिवासी होते. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बिहारचे कॅप्टन आनंद आणि त्यांचे सहकारी जेसीओ भगवान सिंह  यांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. या दु:खाच्याप्रसंगी राज्य शासन कॅप्टन आनंद यांच्या कुटुंबियांसोबत आहे, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर