शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

भीषण अपघात! छातीत आरपार घुसले 40 फुट लांबीचे गज, 5 तास चालले ऑपरेशन अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 16:43 IST

अपघाताचे दृष्य पाहून कुटुंबियांचाही थरकाप उडाला.

रोहतक: कधीही मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा मोठा असतो, म्हणूनच डॉक्टरांना देवाचे रुप म्हटले जाते. रोहतकच्या पीजीआयएमएसमध्ये  डॉक्टरांनी शनिवारी अत्यंत अवघड शस्त्रक्रिया करुन एका तरुणाचे प्राण वाचवले. सुमारे 5 तास चाललेल्या कठीण ऑपरेशननंतर तरुणाच्या शरीरातून लोखंडाचे दोन गज बाहेर काढण्यात आले. सध्या तरुणाची प्रकृती धोक्याबाहेर असून, रुग्णाच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांच्या टीमचे आभार मानले.

नेमकं काय झालं ?कर्ण(वय18) नावाचा तरुण आपल्या दुचाकीवरुन जात होता, तेवढ्यात समोरुन गज घेऊन जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराशी कर्णच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, कर्णच्या छातीतून लांब गज आरपार गेले. अपघाताची माहिती मिळताच त्याचे कुटुंबीय अपघातस्थळी आले, अपघाताचे दृष्य पाहून त्यांचा थरकाप उडाला. कारण, अपघातात कर्णच्या छातीत तब्बल 40 फुट लांबीचे 2 गज घुसले होते. यानंतर जखमी कर्णला तातडीने खानूपर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. तिथे प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्याला रोहतक पीजीआयमध्ये रेफर केले.

पाच तास चालले ऑपरेशनपीजीआयच्या डॉक्टरांनी रात्रीच कटर मशीनने गज कापले आणि कर्णला वाचवण्यासाठी ऑपरेशन सुरू केले. डॉक्टरांनी सुरुवातीला कर्णच्या छातीत घुसलेले गज बाहेर काढले आणि पाच तासांच्या कठीण ऑपरेशननंतर कर्णचे प्राण वाचवले. सध्या त्याला विशेष वॉर्डमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आले आहे. 

अशा वेळी बहुतांश लोकांचा जागीच मृत्यू होतोडॉ.एस.एस.लोहछाब यांच्या नेतृत्वाखाली शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ.संदीप सिंग, डॉ.फरकलीना, प्रा. नवीन महालोत्रा, डॉ.इंद्रा मलिक यांनी ही शस्त्रक्रिया केली. त्यांच्यासाठी हे मोठे आव्हान असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांनी अशी प्रकरणे फार कमी वेळा पाहिली आहेत, कारण अशा प्रकरणांमध्ये बहुतेक जखमींचा जागीच मृत्यू होतो. काही लोक हॉस्पिटलपर्यंत पोहोचू शकत नाहीत. पण, सुदैवाने कर्णचा जीव वाचला आहे.

 

टॅग्स :Accidentअपघातrohtak-pcरोहतकHaryanaहरयाणाdocterडॉक्टर