शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

...अन् गौतम गंभीरनं 'आप'चं आव्हान स्वीकारलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 11:28 IST

गौतम गंभीरने आम आदमी पार्टीचे आव्हान स्वीकारले आहे.

नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्ली लोकसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार गौतम गंभीरने आम आदमी पार्टीचे जनतेसमोर चर्चा करण्याचे आव्हान स्वीकारले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरील यांना राजकारणात येवून 4.5 वर्षे झाली आहेत आणि मला फक्त 4.5 दिवस झाले आहेत. त्यांनी 4.5 वर्षांतील निम्मी वर्षे मला द्यावी, त्यानंतर मी त्यांच्यासोबत जनतेसमोर चर्चा करण्यासाठी तयार आहे, असे गौतम गंभीरने म्हटले आहे.  

दिल्लीतील एका जनसभेला संबोधित करताना गौतम गंभीर म्हणाला, 'मला जनतेसमोर येऊन चर्चा करण्यास भीती वाटते, अशी माझ्या बाबतीत अफवा पसरवली जात आहे. मला पाकिस्तानची भीती नाही, तर चर्चा करण्याची काय असणार?' गौतम गंभीरने या सभेचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून  गौतम गंभीरने आम आदमी पार्टीला उद्देशून सांगितले की,' चर्चा करण्याचे आव्हान स्वीकारतो, जागा तुमची, वेळ तुमची मात्र, सोशल मीडियावर नाही तर जनतेसमोर चर्चा करेन.'

दरम्यान, गौतम गंभीर याच्याकडे दोन मतदान ओळखपत्र असल्याचा आरोप आम आदमी पार्टीकडून करण्यात आला आहे. गौतम गंभीरच्या विरोधातील आम आदमी पार्टीच्या उमेदवार आतिशी मर्लेना यांनी न्यायालयात धाव घेत गौतम गंभीरकडे दोन मतदार ओळखपत्र असल्याने त्यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी केली होती. तसेच, आतिशी मर्लेना यांनी पूर्व दिल्लीतील विकासाबाबत चर्चा करण्याचे खुले आव्हान गौतम गंभीरला दिले आहे. 

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारताचा सलामीवीर गौतम गंभीर राजकीय मैदानात उतरला आहे. त्याला लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने पूर्व दिल्ली मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. गौतम गंभीरची विचारधारा ही भाजपासारखीच आहे. जेव्हा गौतम गंभीर दिल्लीच्या संघाचे कर्णधारपद भूषवत होता. तेव्हा केंद्रीय मंत्री अरुण जेटली हे दिल्लीच्या क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष होते. तेव्हापासून अरुण जेटली आणि गौतम गंभीर या दोघांचे चांगले संबंध असल्याचे पाहायला मिळाले आहेत. गौतम गंभीर हा अरुण जेटली यांचा आवडता खेळाडू होता. त्याचबरोबर आता निवृत्त झाल्यानंतर गौतम गंभीर शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी कार्यरत आहे. 

जम्मू-काश्मीर मुद्यावरून गौतम गंभीर-मेहबूबा मुफ्ती यांच्यात सोशल 'वॉर'!जम्मू-काश्मीरच्या मुद्यावरून पीडीपी पक्षाच्या प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तीवर जोरदार टीका केली होती. मेहबूबा मुफ्ती या जम्मू-काश्मीरला लागलेला 'डाग' असल्याची बोचरी टीका गंभीरने केली होती. यानंतर गौतम गंभीर आणि मेहबूबा मुफ्ती यांच्यात सोशल मीडियावर चांगलीच जुंपली होती. अखेरीस मेहबूबा मुफ्ती यांनी गौतम गंभीरला ट्विटरवर ब्लॉक केले.

टॅग्स :Gautam Gambhirगौतम गंभीरDelhi Lok Sabha Election 2019दिल्ली लोकसभा निवडणूक निकाल 2019AAPआपLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९