शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात मोटारसायकलवरून फिरा निवांत... एसी हेल्मेटने डोकं राहील कूssल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 16:35 IST

बंगळुरूस्थित एका कंपनीनं वातानुकूलित हेल्मेट बाजारात आणलं आहे.

नवी दिल्ली- भारतात मोटारसायकलचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अनेक मोटारसायकल उत्पादक कंपन्या वेगवेगळ्या ऑफर देऊन ग्राहकांना आकर्षितही करत असतात. उन्हाळा कडक असल्यानं ब-याचदा हेल्मेट घालूनच मोटारसायकल बाहेर रस्त्यावर काढावी लागते. हेल्मेटमध्ये उन्हाची झळ बसत नसली तरी बंदिस्त वातावरणात घामाघूम व्हायला होतं. परंतु तुमची हीच गरज ओळखून बंगळुरूस्थित एका कंपनीनं वातानुकूलित हेल्मेट बाजारात आणलं आहे.बंगळुरूमधल्या ब्लू आर्मर कंपनीनं हे हेल्मेट तयार केलं आहे. ब्लू स्नॅप नावाच्या हेल्मेटमध्ये कूलरची व्यवस्था करण्यात आली आहे. या हेल्मेटची किंमत 1609 रुपये इतकी असून, कमी बजेट असलेले मोटारसायकलस्वारही हे हेल्मेट खरेदी करू शकतात. सध्या दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात या हेल्मेटची विक्री सुरू आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत 44 ते 45 अंश सेल्सियस तापमान असल्यानं हे हेल्मेट बाइकस्वारांसाठी फायदेशीर ठरणार आहे. तसेच ट्रॅफिकमध्ये या हेल्मेटमुळे काहीसा दिलासा मिळणार आहे. परंतु हे हेल्मेट सध्या ऑनलाइन उपलब्ध असून, अनेकांनी हेल्मेट खरेदी करण्यास पसंती दर्शवली आहे.या हेल्मेटमध्ये एअर कूलिंगची सिस्टीम देण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे हेल्मेट तुम्हाला फक्त कूलिंगच देणार नाही, तर धुळीपासूनही तुमचं संरक्षण करणार आहे. त्यामुळे मुंबई, दिल्लीसारख्या मेट्रो सिटीमध्ये मोटारसायकलवरून फिरत असताना वायू प्रदूषणापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हे हेल्मेट फायदेशीर ठरणार आहे. या हेल्मेटमधील एअर फिल्टर 3-6 महिन्यांनी बदलल्यास तुमचं प्रदूषणापासून संरक्षण होणार आहे. ब्लूस्नॅप हेल्मेटमधील कूलरमध्ये लिथियम बॅटरी देण्यात आली असून, ती यूएसबीच्या माध्यमातून चार्ज करता येते. सध्या तरी हे हेल्मेट बाइकस्वारांच्या पसंतीस उतरलं आहे.