शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

ईडीचा दुरुपयोग; संसदेमध्ये गोंधळ; कामकाज चालू असताना खरगेंना ईडीचे समन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 05:54 IST

लोकसभा, राज्यसभा दिवसभरासाठी स्थगित

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली :  ईडीच्या दुरुपयोगावरून काँग्रेस सदस्यांनी गोंधळ घातल्याने लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज गुरुवारी दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी आक्रमक पावित्रा घेतला़. केंद्र सरकारवर ईडीच्या दुरुपयोगाचा आरोप करून काँग्रेस सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे दोन वेळा सभागृहांचे कामकाज तहकूब करण्यात आले होते. अध्यक्षांनी विरोधकांना मुद्दे उपस्थित करण्यास परवानगी दिली नाही. त्यानंतर काँग्रेस सदस्य अध्यक्षांच्या आसनासमोरील जागेत आले, तर द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस व सीपीआय-एम आणि अन्य सदस्यांनी आपापल्या जागी उभे राहून निषेध करीत होते. त्यानंतर दुपारी दोन वाजता सभागृहाचे कामकाज सुरू होताच काँग्रेस सदस्यांच्या घोषणाबाजीत दोन ठराव संमत झाले. गोंधळातच वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दोन ठराव मांडले.  

काँग्रेसच्या सदस्यांकडून जोरदार घोषणाबाजीकाँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षाच्या सदस्यांनी ईडीची कारवाई, आवश्यक वस्तूंवरील जीएसटी आणि भाववाढीला जोरदार विरोध केला. तथापि, ११.३० वाजता काँग्रेसचे काही सदस्य हातात फलक घेऊन अध्यक्षांच्या आसनापुढील जागेत उभे असताना अध्यक्ष ओम बिरला यांनी दुपारी दोन वाजेपर्यंत कामकाज स्थगित केले. लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी पहिल्यांदा फलक दाखविले आणि नंतर अन्य सदस्यांनी फलक आणले.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयlok sabhaलोकसभा