शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

अटल पेंशन योजना फ्लॉप!

By admin | Updated: January 28, 2016 01:54 IST

मोदी सरकारच्या बहुचर्चित अटल पेन्शन योजनेला वर्षभरात फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. गतवर्षी ९ मे रोजी लागू केलेल्या या योजनेत वर्षभरात २ कोटी खाती उघडण्याचे लक्ष्य ठरवले.

- सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीमोदी सरकारच्या बहुचर्चित अटल पेन्शन योजनेला वर्षभरात फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. गतवर्षी ९ मे रोजी लागू केलेल्या या योजनेत वर्षभरात २ कोटी खाती उघडण्याचे लक्ष्य ठरवले. प्रत्यक्षात १६ जानेवारी १६ पर्यंत केवळ १८ लाख ९९ हजार लोकांनीच या योजनेत भाग घेतला आहे. ज्या वर्गासाठी ही योजना लागू करण्यात आली, त्यात एकतर जागरूकतेचा अभाव तसेच पेंशनच्या रकमेसाठी दीर्घकाळाचा ‘लॉक इन पीरिएड’ असल्याने अनेक वर्षे आपली रक्कम अडकून राहू नये, म्हणून लोकांमध्ये फारसा उत्साह नाही.ज्यांचे वय १८ ते ४0 वर्षे आहे असे तरुण खातेदार अटल पेंशन योजनेसाठी मुख्यत्वे पात्र आहेत. सदर योजनेत दरमहा ४२ रुपयांपासून १४५२ रुपयांची रक्कम या खातेदारांनी गुंतवली, तर वयाच्या ६0 व्या वर्षानंतर त्यांच्या खात्यात जमा रकमेनुसार दरमहा १ हजार ते ५ हजार रुपयांची रक्कम दरमहा पेंशनच्या स्वरूपात त्यांना मिळणार आहे. पहिल्या ५ वर्षांपर्यंत प्रीमियमच्या निम्म्या रकमेची (अधिकतम १ हजार) पर्यंत सरकारतर्फे सबसिडीही दिली जाते. जितकी अधिक रक्कम खातेदार या योजनेत गुंतवील, तितक्या अधिक रकमेच्या पेंशनला तो पात्र ठरेल, अशी ही योजना आहे.यातील महत्त्वाची त्रुटी अशी की, वयाच्या २0 व्या वर्षी एखाद्या तरुणाने योजनेत खाते उघडले, तर वयाची ६0 वर्षे पूर्ण होईपर्यंत गुंतवलेल्या रकमेतला एक पैसाही त्याला काढता येणार नाही. थोडक्यात, रक्कम अडकून रहाण्याचा ‘लॉक इन पीरिएड’ तब्बल ४0 ते ४२ वर्षांचा आहे. हे लक्षात घेऊन सरकार काही नियम शिथिल करण्याच्या विचारात असल्याचे सूत्रांनी सांगितले.विशेष मोहीमही फसलीअटल पेंशन योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी मुख्यत्वे पेंशन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटीकडे (पीएफआरडीए) सोपवण्यात आली आहे. अधिकाधिक संख्येत तरुणांनी खाती उघडावीत, यासाठी अ‍ॅथॉरिटीने २९ व ३0 डिसेंबर १५असे दोन दिवस खास ‘लॉग इन डे’ जाहीर केले.तमाम बँकांनी या दोन दिवशी बाकीची कामे बाजूला ठेवून, फक्त अटल पेंशन योजनेची खाती उघडावीत, असे अ‍ॅथॉरिटीतर्फे सूचित करण्यात आले, तरीही सदर योजनेला नियोजित लक्ष्य गाठता आले नाही. अवघा ९.४९ टक्केच प्रतिसाद मिळाला.