शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

मेहुल चोक्सीनं सोडलं भारतीय नागरिकत्व; प्रत्यार्पण आणखी अवघड होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 11:18 IST

प्रत्यार्पण प्रकरणावरील सुनावणीच्या एक दिवस आधी स्वीकारलं अँटिग्वाचं नागरिकत्व

नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठ्या बँकिंग घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीनं भारतीय नागरिकत्व सोडलं आहे. पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 14 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या चोक्सीनं त्याचा पासपोर्ट एँटिग्वातील भारतीय उच्चायुक्तालयात जमा केला. पीएनबीमधील घोटाळा समोर येताच चोक्सी जानेवारीत देश सोडून पळाला. आता त्यानं भारतीय नागरिकत्व सोडल्यानं त्याच्या प्रत्यार्पणाची शक्यता धूसर झाली आहे. मेहुल चोक्सीनं आज भारतीय पासपोर्ट जमा करत अँटिग्वाचं नागरिकत्व स्वीकारलं. चोक्सी आता भारतीय नागरिक नसल्यानं त्याला भारतात आणणं आणखी अवघड झालं आहे. विशेष म्हणजे मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पण प्रकरणात उद्याच सुनावणी होणार होती. मात्र त्याआधीच त्यानं स्वत:ला अँटिग्वाचा नागरिक घोषित केलं. यासाठी त्यानं एकूण 177 डॉलरचं हमीपत्र दिलं. याबद्दलची माहिती परराष्ट्र मंत्र्यालयानं गृह मंत्रालयाला दिली आहे. चोक्सीनं जमा केलेल्या पासपोर्टचा क्रमांक Z3396732 असा आहे. यापुढे चोक्सीचा अधिकृत निवासी पत्ती हार्बर, अँटिग्वा असेल.मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाचे प्रयत्न मोदी सरकारकडून सुरू आहेत. मात्र त्यानं अँटिग्वाचं नागरिकत्व स्वीकारल्यानं या प्रयत्नांना धक्का बसला आहे. गेल्या सुनावणीवेळी चोक्सीनं त्याच्या प्रकृतीचं कारण दिलं होतं. प्रकृती ठिक नसल्यानं विमानातून 41 तास प्रवास करुन भारतात येऊ शकत नाही, असं कारण चोक्सीनं दिलं होतं. चोक्सीला फरार घोषित करण्यासाठी पीएमएलए विशेष कोर्टात सक्तवसुली संचलनालयानं याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान चोक्सीनं न्यायालयानं प्रकृती अस्वास्थाचं कारण दिलं.   

टॅग्स :Punjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाPunjab National Bankपंजाब नॅशनल बँकBanking Sectorबँकिंग क्षेत्रfraudधोकेबाजी