शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Election 2020 : "मोदी, शहांच्या सभांचा भाजपाला फायदा होणार; पण सत्तेचा वनवास कायम राहणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 20:43 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे चाणक्य समजले जाणाऱ्या अमित शाहांनी दिल्लीच्या निवडणुकीच्या प्रचारात उडी घेतल्यानं चांगलीच रंगत आली आहे.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे चाणक्य समजले जाणाऱ्या अमित शाहांनी दिल्लीच्या निवडणुकीच्या प्रचारात उडी घेतल्यानं चांगलीच रंगत आली आहे. भाजपाच्या या दोन नेत्यांनी दिल्लीच्या राजकारणाच्या हवेची दिशाच बदलली आहे. एबीपी न्यूज आणि सी व्होटरनं केलेल्या सर्व्हेनुसार, 61 टक्के लोकांना वाटतं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीचा भाजपाला फायदा होणार आहे. परंतु निवडणुकीत आम आदमी पार्टी 42 ते 56 जागा जिंकू शकते, तर भाजपाला 10 ते 24 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे. दिल्लीतला सत्तेचा वनवास भाजपाला काही संपुष्टात आणता येणार नाही. एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या सर्व्हेनुसार 62 टक्के लोकांनी शाहीन बागेत धरणे आंदोलन करणं चुकीचं असल्याचं नमूद केलं आहे. तर 83 टक्के लोकांच्या मते, शाहीन बागेतील आंदोलन हा राजकारणाचा एक भाग झाला आहे. तसेच 39 टक्के लोकांच्या म्हणण्यानुसार शाहीन बागेतल्या मुद्द्याचा भाजपाला फायदा होईल, तर 25 टक्के लोकांच्या मते, आम आदमी पार्टीला हे आंदोलन फायदेशीर ठरणार आहे. फक्त चार टक्के लोकांना या मुद्द्यावरून काँग्रेसला फायदा होत असल्याचं वाटत असल्याचं समोर आलं आहे.सर्व्हेमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या निवडणूक रॅलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. या रॅलींचा भाजपाला फायदा होऊ शकतो हे 53 टक्के लोकांना वाटतं, तर 29 टक्के लोकांना याचा फायदा होणार नाही, असं वाटत आहे. 11 टक्के लोकांना हे सर्व काही कठीण असल्याचं वाटत आहे.केजरीवालांवर वैयक्तिक हल्ल्यानं भाजपाला फायदा होणार नसल्याचं 48 टक्के लोकांना वाटत आहे. 72 टक्के लोक केजरीवालांना बाहेरचा समजत नाही, तर 21 टक्के लोकांना केजरीवाल बाहेरचे वाटतात. केजरीवालांवर वैयक्तिक हल्ला केल्यानं 24 टक्के लोकांना वाटतं भाजपाला काहीही नुकसान होणार नाही. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी