शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Vaccine : गुड न्यूज! १० एप्रिलपासून १८ वर्षांवरील सर्वांना मिळणार कोरोना लसीचा बूस्टर डोस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 15:24 IST

१८ वर्षांवरील सर्वांना आता कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस देण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत (Coronavirus Patient) मोठ्या प्रमाणात घट होत आहे.  तर दुसरीकडे कमी होणाऱ्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आता कोविडचे सर्व निर्बंधही हटवले आहेत. असं असलं तरी आता सर्वसामान्यांसाठी आणखी एक गुड न्यूज आहे. १८ वर्षांवरील सर्वांना आता कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस देण्यात येणार आहे. १० एप्रिल पासून सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर (प्रिकॉर्शनरी) डोस देण्यात येईल.

१८ वर्षांवरील ज्या व्यक्तींनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत आणि ज्यांना लसीचा दुसरा डोस घेऊन ९ महिने पूर्ण झाले आहेत, त्यांना कोरोना लसीचा बूस्टर डोस देण्यात येणार आहे. परंतु हा कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस खासगी लसीकरण केंद्रांमध्ये घेता येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. याशिवाय कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेण्यासाठी पात्र असलेल्या, तसंच आरोग्य सेवा कर्मचारी आणि ६० वर्षांवरील नागरिकांसाठी बूस्टर डोस सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत सुरूच राहिल आणि त्याला गती दिली जाईल असंही आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.पूनावाला यांनीही केली होती विनंतीसीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी बूस्टर डोससंदर्भात मोठं वक्तव्य केलं होतं. "देशानं योग्य लस निवडली म्हणूनच यावेळी देशात कोरोनाबाधितांची संख्या कमी आहे," असं ते म्हणाले होते. "बूस्टर डोसबद्दल आम्ही सरकारकडे आवाहन केलं आहे. कारण ज्यांना प्रवास करणं आवश्यक आहे त्यांना बूस्टर डोसची गरज आहे. आपण सरकार सोबत चर्चा करत असून लवकरच बूस्टर डोसवर एक धोरण घोषित केलं जाऊ शकतं," असंही ते म्हणाले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारत