शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

Abhishek Banerjee : "दररोज ९० आणि दर १५ मिनिटाला १..."; अभिषेक बॅनर्जींनी ममता सरकारला दिला 'हा' सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 12:30 IST

Abhishek Banerjee And Kolkata Doctor Case : तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी कोलकाता येथील ट्रेनी डॉक्टर हत्या प्रकरणावर मौन सोडलं आहे. कठोर कायदा आणण्याची मागणी केली.

तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी कोलकाता येथील ट्रेनी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणावर मौन सोडलं आहे. अभिषेक बॅनर्जी यांनी बलात्काराच्या प्रकरणांबाबत कठोर कायदा आणण्याची मागणी केली. तसेच बलात्कारी आणि नराधमांवर त्वरीत खटला चालवण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये अभिषेक बॅनर्जी यांनी देशाच्या विविध भागांमध्ये घडणाऱ्या बलात्काराच्या घटनांचा उल्लेख केला आणि सांगितलं की, दररोज ९० बलात्काराच्या बातम्या समोर येतात. ते म्हणाले की, निर्णायक पावलं उचलण्याची नितांत गरज आहे आणि त्यासाठी मजबूत कायदे आवश्यक आहेत.

अभिषेक बॅनर्जी यांनी लिहिलं की, "गेल्या १० दिवसांपासून जेव्हा संपूर्ण देश #RGKarMedicalcollege घटनेचा निषेध करत आहे आणि न्यायाची मागणी करत आहे, लोक रस्त्यावर उतरून या भयंकर गुन्ह्याविरोधात आंदोलन करत होते, नेमकं तेव्हाच भारताच्या विविध भागात बलात्काराच्या ९०० घटना घडल्या आहेत. दुर्दैवाने, कायमस्वरूपी उपायांवर अजूनही फारशी चर्चा झालेली नाही."

आकडेवारीचा हवाला देत अभिषेक बॅनर्जी यांनी पुढे म्हटलं की, "दररोज ९० बलात्काराच्या घटना, दर तासाला ४ घटना आणि दर १५ मिनिटाला एक बलात्काराची घटना नोंदवली जात आहे. तातडीने निर्णायक पावलं उचलण्याची गरज आहे. आम्हाला असे मजबूत कायदे हवे आहेत ज्यात ५० दिवसांच्या आत खटला आणि दोषींना दोषी ठरवलं जावं आणि नंतर कठोर शिक्षा द्यावी. पोकळ आश्वासनं देऊन काहीही साध्य होणार नाही."

"राज्य सरकारांनी कारवाई करावी आणि बलात्कारविरोधी कठोर कायदा करण्यासाठी केंद्रावर तातडीने दबाव आणावा. जलद आणि कठोर न्याय सुनिश्चित करणारा कायदा बनवला गेला पाहिजे. वेक अप इंडिया!" असं अभिषेक बॅनर्जी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालCrime Newsगुन्हेगारीMamata Banerjeeममता बॅनर्जी