शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

विंग कमांडर अभिनंदन पुन्हा विमान उडवणार का? हवाई दल प्रमुख म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 14:44 IST

अभिनंदन यांनी कालच व्यक्त केली होती पुन्हा विमान उड्डाणाची इच्छा

कोईमतूर: जवळपास 60 तास पाकिस्तानच्या ताब्यात राहिल्यानंतर मायदेशी परतलेले हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी काल पुन्हा एकदा उड्डाण करण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर आज हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ यांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर या प्रश्नाचं उत्तर अभिनंदन यांच्या वैद्यकीय तंदुरुस्तीवर अवलंबून असल्याचं धनोआ म्हणाले. हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ यांनी पत्रकार परिषद घेऊन एअर स्ट्राइकवर सविस्तर भाष्य केलं. यावेळी त्यांना अभिनंदन पुन्हा विमान उड्डाण कधी करणार, असा प्रश्न विचारण्यात आला. 'ते (विंग कमांडर अभिनंदन) पुन्हा विमान उड्डाण करू शकतात की नाही, हे त्यांच्या वैद्यकीय तंदुरुस्तीवरून ठरेल. अभिनंदन यांनी त्यांच्या विमानातून उडी घेतली. यानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. त्यांच्यावर आवश्यक ते उपचार केले जात आहेत. ते शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त झाल्यावर कॉकपिटमध्ये परततील,' असं धनोआ यांनी सांगितलं. मिग-21 विमानातून एफ-16 सारखं अत्याधुनिक विमान जमीनदोस्त करणाऱ्या अभिनंदन यांचं सध्या सर्वत्र कौतुक सुरू आहे. जवळपास 60 तास पाकिस्तानच्या ताब्यात राहिल्यानंतर मायदेशात परतलेल्या विंग कमांडर अभिनंदन यांची आकाशाची ओढ कायम आहे. पाकिस्तानी सैन्याला कोणतीही गोपनीय माहिती न देणाऱ्या अभिनंदन यांनी पुन्हा एकदा कॉकपिटमध्ये परतण्याची इच्छा कालच व्यक्त केली. मला लवकरच विमान उडवायचं आहे, अशी भावना अभिनंदन यांनी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांकडे बोलून दाखवली. नवी दिल्लीतल्या सैन्याच्या रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात अभिनंदन यांच्यावर उपचार सुरू आहेत. काल संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे आणि वरिष्ठ कमांडोंनी अभिनंदन यांची भेट घेतली. यानंतर वरिष्ठ कमांडो आणि डॉक्टरांकडे अभिनंदन यांनी लवकरात लवकर विमान उड्डाण करण्याची इच्छा व्यक्त केली. भारतीय हवाई दलानं 26 फेब्रुवारीला पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले चढवले. यानंतर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानी हवाई दलानं भारतीय हद्दीत घुसखोरी केली. पाकिस्तानच्या हवाई दलाला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताची मिग-21 विमानं हवेत झेपावली. यावेळी दोन्ही हवाई दलांमध्ये संघर्ष सुरू असताना  अभिनंदन यांनी पाकिस्तानचं एफ-16 हे अत्याधुनिक विमान जमीनदोस्त केलं. अभिनंदन हे एफ-16 विमान पाडणारे भारतीय हवाई दलाचे पहिले वैमानिक आहेत. 

टॅग्स :Abhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानindian air forceभारतीय हवाई दलIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPakistanपाकिस्तान